*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माळशिरस वकिल संघटनेच्या वतीने माळशिरस न्यायालयातील वकील संघाच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वकील संघटनेच्या अध्यक्षा ॲड.मोहिनी देव, उपाध्यक्ष ॲड.राहुल लवटे,ज्येष्ठ विधिन्य ॲड.माधव मिराजदार, ॲड.एस.बी.पाटील,ॲड.डी.एन. काळे,ॲड.आर.एस.वाघमोडे, ॲड.जी.पी.कदम आदी मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले व सामुदायिक संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड.सुयश सावंत व ॲड.वैभव धाईंजे यांनी संविधानाचे मूल्य,जोपासना व संविधानाच्या साक्षरतेच्या गरजेचे आहे वरती भाष्य करून वक्तृत्व सदर केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड.भारत गोरवे यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड.सुमित सावंत यांनी केले.या कार्यक्रमास माळशिरस वकील संघटनेचे वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड.धनंजय बाबर,ॲड.भारत गोरवे ॲड. सुमित सावंत,ॲड.अभिषेक चंदनशिवे,ॲड.वैशाली कांबळे, ॲड.मनोज धाईंजे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा