*उपसंपादक --- नूरजहाँ शेख*
*टाइम्स ४५ न्यूज मराठी
टेंभुर्णी (ता.माढा) येथील सद्गुरू बहुउद्देशीय संस्था संचलित गोविंद वृध्दाश्रम टेंभुर्णी व अ ग्रुप बाभुळगाव यांच्या वतीने मुंबई येथे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या स्मरणार्थ वीरमाता,वीरपत्नी यांचा सन्मान पोलीसातील देवमाणूस,गुणवंत विद्यार्थी,महिला कुस्तीपटू, खेळाडू,समाजसेवक,दानशूर व्यक्ती,गुणवंत डॉक्टर यांचा गुणगौरव व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले ,शाहिद दिनानिमित्त अयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ५१ लोकांनी रक्तदान करून पुण्यकर्म केले.
कार्यक्रमाची सुरुवात आश्रमातील बालकांनी टाळ मृदूंगा च्या गजरात सुंदर अशा भजनाने केली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी सैनिक कैलास गवळी ,डॉ.लक्ष्मण आसबे नॅशनल खेळाडू, विरपत्नी व कवियंत्री यांच्या हस्ते शहीद जवानांना पुष्प अर्पण व नमन करून दीप प्रज्वलन करण्यात असले.
नॅशनल सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू शिवानी प्रकाश करचे ,नॅशनल रोप्य पदक विजेती कुस्तीपटू अनुष्का दत्तात्रय यादव,पैलवान ज्ञानेश्वरी शिंदे ३६ किलो...रोप्य पदक विजेती ,पै.गायत्री शिंदे ३९ किलो मध्ये कान्स्यपदक विजेती या नॅशनल खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .या प्रसंगी वीर पत्नी सुवर्णाताई डोईफोडे ,सुरेखाताई जाधव ,पुनम गिरीमकर गणेशगांव येथील कवियंत्री नूरजहाँ शेख यांना काव्य सम्राज्ञी पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांना सन्मांचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सचिन पराडे पाटील भूषण भैया पराडे पाटील,जयेश पाटील शंकर अण्णा विकि अण्णा उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन भागवत रावसाहेब पराडे पाटील A ग्रुप बाभुळगाव यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा