Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

*श्री तुळजाभवानी संस्थान मंदिर व्यवस्थापक व विश्वस्तावर आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई करावी---" श्याम पवार" यांची मागणी*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

विषय :-   विषय दिनांक 15/11/2024 रोजी मंदिर संस्थांनी श्री तुळजाभवानी देवीचे पूजेचे दर निश्चित करण्याबाबत काढलेले पत्रानुसार दिनांक 22/11/2024 रोजी मंदिर प्रशासकीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करून आचारसंहितेचा भंग केल्याने संबंधीतावर कायदेशीर कारवाई करणे बाबत. 

संदर्भ :-  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान जा.क्र.2024-25/श्री जुभमंसंतु/धार्मिक/1881 दिनांक 15/11/2024 चे पत्र. 

तक्रारदार - शाम अंबादास पवार रा. क्रांती चौक तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव. 

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रान्वये तक्रार सादर करतो की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन तुळजापूर यांनी दिनांक 15/11/2024 रोजी तुळजापुरातील भोपे, पाळेकर व उपाध्ये पुजारी मंडळाला सोबत घेऊन श्री तुळजाभवानी देवीचे पूजेचे दर निश्चित करण्याबाबत दिनांक 22/11/2024 रोजी मंदिरच्या प्रशासकीय कार्यालयात बैठक घेण्यात येत आहे.

सदरील बैठक निवडणुकीच्या आचारसंहिता चालू असल्याने मंदिर संस्थांचे तहसीलदार तसेच विश्वस्त यांच्या संगणपत करुन राजकीय उमेदवारास मदत होण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आचारसंहितेची कालावधी चालू असताना तुळजापुरातील व्यापारी व पुजाऱ्यांना दबाव आणण्यासाठी किंवा प्रभावित करण्यासाठी या बैठकीच्या आयोजन करण्यात आल्याचे दिसून येते. सदर बैठकीमुळ तुळजापूर शहरातील पुजारी व व्यापारी हे भयभित झाल्याचे दिसुन येत आहे. 

सदरील बाब ही निवडणूक आचार संहितेचा भंग असून सदरील घटनेस जबाबदार असणाऱ्या मंदिराच्या तहसीलदार तसेच विश्वस्तांवरती तात्काळ आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा ही विंनती. 





सोबत:- संदर्भीय पत्राची प्रत. 

           आपला नम्र. 


       शाम आंबादास पवार 

     मो.क्र. 9822777166

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा