Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

"*तुळजापूर मंदिर संस्थांनचा प्रकार म्हणजे "घरची उपाशी बाहेरची तुपाशी"----शाम पवार*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर भाविक दानपेटीत आपापल्या इच्छेनुसार 'दान' टाकतात, या माध्यमातून आजवर जमा झालेले सुमारे अडीचशे कोटी विविध बँकांत आहेत. है पैसे सामाजिक उपक्रमासाठी खर्चावेत, अशा स्वरूपाच्या मागण्या वेळोवेळी पुढे आल्या. 'मंदिर कवायत'चा दाखला देत हे प्रस्ताव फेटाळण्यात आले. मात्र, पहिल्यांदाच मंदिर संस्थानने जिल्हा परिषद शाळांसाठी १० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली. तसा ठराव घेऊन मंजुरीसाठीचा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे धाडला आहे. तिथे सध्या हिअरिंग सुरू आहे


राज्य सरकारने जिल्ह्यातील दहा शाळांची उत्कृष्ट शाळा म्हणून निवड केली आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड, अशा या मॉडेल स्कूल तयार केल्या जाणार आहेत.



यासाठी काही प्रमाणात शासनाकडून निधी आला आहे. मात्र, ही तरतूद पुरेशी नसल्याने मंदिर संस्थानकडून पैसे मिळावेत, असा मुद्दा

पुढे आला होता. गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांची मुले शिकणाऱ्या शाळांना हे पैसे जात असल्याने मंदिर संस्थानच्या बैठकीत तसा ठराव पारित केला होता.

यानंतर १० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंजूर करून तो थेट



धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सादर केला. त्यात काही त्रुटी निघाल्यानंतर त्यांची पूर्तता करण्यात आली. आता प्रस्तावाच्या अनुषंगाने हिअरिंग सुरू आहे.

तेथील प्रक्रिया पूर्ण होऊन हिरवा कंदिल मिळताच, तब्बल १० कोटी रुपये जिल्हा परिषद शाळांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.



*कोणत्या शाळेला किती रक्कम*


जिल्हा परिषद शाळा सांजा 1 कोटी ५५ लाख रुपये ,काजळा -30 लाख, खुदावाडी 2 कोटी 20लाख, बलसुर 1 कोटी 36 लाख, हिप्परगा रवा 1 कोटी 14 लाख ,शिराढोण ता. कळंब 95 लाख ,जिल्हा परिषद कन्या शाळा वाशी ८३ लाख ,जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ईट- 98 लाख 65 हजार तर पिंपळवाडी ता. परंडा शाळेस 68 लाख 35 हजार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


राज्य शासनाने उत्कृष्ट शाळा म्हणून दहा शाळांची निवड केली आहे या सर्व शाळांना मंदिर स्कूल म्हणून पुढे आणले जाणार आहे शासनाकडून तरतूद उपलब्ध झाली आहे परंतु रक्कम पुरेशी नाही त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून 10 कोटी देण्याचा ठराव यापूर्वीच घेतला होता जिल्हास्तरावरून तो धर्मादाय आयुक्ताकडे पाठविला आहे तिथे सध्या हिअरिंग चालू आहे हे प्रक्रिया होऊन मंजुरी मिळतात शाळांना पैसे वर्ग केले जातील 


*डॉ-सचिन ओंबासे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्था अध्यक्ष तुळजापूर*


*👆ही वरील सर्व दैनिकलोकमत ची बातमी आहे*


तर मंदिर संस्थान कडून जिल्ह्यातील इतर शाळांना करोडो रुपये निधी मंजूर होत असताना मात्र तुळजापूर शहरांमध्ये साळुंखे गल्ली येथील जिल्हा परिषद कन्या शाळे ची अवस्था पहा हे मंदिर संस्थान बाहेरच्या जिल्हा परिषद शाळेला मदत करत आहे तुळजापूर येथील मंदिर संस्थांच्या पैशावर बाहेर चा विकास होतो आणि संस्था जवळ असलेल्या शाळा भकास दिसत आहे "*घरची उपाशी आणि बाहेरची तुपाशी"* असा प्रकार असून हा निर्णय कोणाच्या अधिकारात केला आहे असा सवाल, धाराशिव जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे धाराशिव जिल्हा मा. उपजिल्हा प्रमुख *शाम पवार* यांनी केला आहे. पहा जिल्हा बाहेर शाळांना केलेली मदत तसेच "दैनिक लोकमत "ची बातमी आणि तुळजापूर शहरातील शाळेची वस्तुस्थिती मांडणारा व्हिडिओ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा