*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
काळेगाव ता.तुळजापूर येथील प्रचार सभेत उमेद C R P उमेद गट व अधिकारी यांनी प्रचारात सहभागी होऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी "अमोल शिवाजी जाधव "(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )यांनी 241 तुळजापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केकेली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की
दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी काळेगाव ता. तुळजापूर येथे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ काळेगाव ता. तुळजापूर येथे रॅली होती तेथे C R P उमेद गटाच्या *कल्पना मच्छिंद्र चव्हाण* यांनी प्रचार रॅलीत सहभागी होऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावातील C R P उमेदगट अशाप्रकारे प्रचार करत असून उमेश गटाच्या मार्फत मतदारांना प्रलोभन दाखवून साडी वाटप आणि इतर प्रलोभने दाखवण्याचे काम तालुक्यात उमेद गट करत आहे, गटातील महिलांना मोबाईल कॉल करून मीटिंग घेणे व प्रचार करणे असे प्रकार 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघात चालू असून C R P उमेल गट व अधिकारी यांचे मोबाईल कॉल तपासून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी अशी मागणी "अमोल जाधव "यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा