Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

*पुणे जिल्ह्यातील या गावात ४ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला--- उसाच्या शेतात सापडला मृत्यूदेह.- -+ग्रामस्थांमध्ये घबराट*

 


*विशेष--- प्रतिनिधी*

   *एहसान----मुलाणी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  ,*मो:-9096837451

पुणे : पुण्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरातील टेंभेकरवस्ती येथील घराच्या अंगणात खेळत असलेल्या ४ वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवतेज समाधान टेंभेकर (वय-४ वर्षे, मु. रा. फराटेवाडी, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १५) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नरभक्षक बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला करून जवळच्या ऊसात फरफटत नेले. या घटनेने परिसरात भीतीचे वातवरण पसरले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवतेज हा टेंभेकरवस्ती येथील घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक नरभक्षक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर चिमुकल्याला जवळच्या उसाच्या शेतात फरफटत नेले. त्यानंतर सुमारे दिड तासाने मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला.


या हल्यात मुलाचे धडापासून मुंडके वेगळे झाले होते. अशा अवस्थेत मृतदेह सापडल्याने नागरीक आक्रमक झाले होते. स्थानिकांनी आक्रमक होऊन वन विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला. वन विभागाला एक महिन्यात १४ पिंजाऱ्यांमध्ये एकही बिबट्या जेरबंद करण्यासाठी यश कसे आले नाही, असा जाब लोकांनी विचारला. वन विभागाने अनेक प्रयत्न करूनही एकही बिबट्या अद्यापपर्यंत पकडता आलेला नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा