*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
------- इंदापूरची जनता आजी-माजी आमदारांच्या जाचाला कंटाळून नव्या बाजीच्या शोधात आहे. परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण मानेंसारखे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आता इंदापूरला हवे आहे. तेच इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करू शकतात, असा विश्वास इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी दिली.
लुमेवाडी (ता. इंदापूर) येथे गाजिए मिल्लत हाजी हाफिज फतेह मोहंमद जोधपुरी बाबांच्या दर्गाहमध्ये जाऊन मजारवर चादर चढवून दर्शन घेतले. त्यानंतर
लुमेवाडीकरांशी संवाद साधताना मयूरसिंह पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, प्रवीण माने यांनी त्यांच्या
दूरदृष्टीतून इंदापूर तालुक्याचा विकासाचा
पॅटर्न तयार केला असून, बेरोजगार तरुणांना रोजगार, शेतीला शाश्वत पाणी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ, आरोग्याच्या सुविधा, धार्मिक स्थळांचा विकास यासह विविध विकासकामांची आखणी केली आहे. माने परिवाराने शून्यातून प्रगती करत औद्योगिक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला आहे. यावरून त्यांची जिद्द, चिकाटी, विकासाची दूरदृष्टी दिसून येत असल्याचे पाटील म्हणाले.
ज्यांना आपण मागील २० वर्षे इंदापूर तालुक्याची एक हाती सत्ता दिली, त्यांनी केवळ विकासाचे चित्र रंगवले. प्रत्यक्षात त्यांना विकास करता आला नाही. तर दुसऱ्या लोकप्रतिनिधींना दहा वर्षे दिली. त्यांनी केवळ जवळच्यांचा विकास केला, अशी टीकाही त्यांनी आपले बंधू, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर नाव न घेता केली.
या वेळी बाबासाहेब चवरे, शरद चितारे, दादासाहेब थोरात, उमेश घोगरे, नागेश गायकवाड, समद सय्यद यांच्यासह गावातील तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
निरा नदीत पाणी अडवून बंधाऱ्यांची दुरुस्ती करणार : माने
'लुमेवाडी गाव के जोधपुरीवाले बाबा की दुवा और गाव के भाईयोंने मुझपर आज तक बहुत ज्यादा मोहब्बत की है, ये मेरे दिल मे रहनेवाले लोग है।' असे म्हणत प्रवीण माने यांनी लुमेवाडी गाव हे तालुक्याच्या शेवटचे गाव असून, निरा नदीतील पाण्याची समस्या व त्यातील गळतीधारक बंधारे दुरुस्त करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा