*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा अभियान १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधी दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आगार अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी आगार अकलूज येथे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला.
या अभियान शुभारंभ प्रसंगी एसटी आगारातील सर्व एसटी चालकांना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले यांनी रस्ता सुरक्षा नियमाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच अपघात ही निश्चितपणे टाळता येण्यासारखी गोष्ट आहे असे सांगितले.आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी आगामी वर्षात अकलूज आगार हे पूर्णपणे अपघातमुक्त होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके यांनी एसटी बस चालकांना अपघात मुक्त प्रवासासाठी रस्त्यावर लक्ष,चांगली झोप,मोबाईल न वापरणे सुरक्षितपणे वाहन ओव्हरटेक करणे या सुरक्षा उपायांची माहिती दिली. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शितल शिंदे यांनी सर्व उपस्थिताना रस्ता सुरक्षा शपथ दिली.
याप्रसंगी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राजेंद्र राऊत, वाहन चालक राजेंद्र जाधव,विक्रांत चव्हाण व इतर यांची उपस्थिती होती.शुभारंभानंतर परिवहन आयुक्त महाराष्ट्र, राज्य यांनी घेतलेल्या व्हीसीद्वारे रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान जानेवारी २०२६ या महिन्यात २०२५ च्या तुलनेत रस्ते अपघात मृत्यू संख्येमध्ये १५ टक्के घट घडविण्याचे उद्दिष्ट सर्व परिवहन कार्यालयांना दिले आहे.हे उद्दिष्ट गाठण्यासाठी जानेवारी २०२५ या महिन्यात अधिक अपघाती मृत्यू नोंद झालेल्या झालेल्या टेंभुर्णी,सांगोला,कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिक रस्तासुरक्षा नियम जनजागृती तसेच मोटर वाहन कायद्याअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांसाठी कारवाई व इतर रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहेत.असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विन कुमार पोंदकुले यांनी याप्रसंगी सांगितले.या कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नव्याने दाखल झालेल्या रडार वाहनाद्वारे हेल्मेट न वापरणारे दुचाकी चालक यांच्यावर प्रामुख्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पोंदकुले यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा