Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

*अकलूज पोलीस स्टेशन कडून चोरी करणारे परप्रांतीय टोळीतील तीन आरोपीना अटक २०,३६,६८० रुपयाचा मुद्देमाल जप्त*

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*



फिर्यादी आनंद हणुमंतराव भोसले रा. यशवंतनगर ता. माळशिरस यांनी, दिनांक २६/१२/२०२५ रोजी रात्रौ ०१. ०० वा. ते सकाळी ११.०० वा. चे दरम्यान फिर्यादीचे संयुक्तानगर, यशवंतनगर येथील बी. एस. कंस्ट्रक्शन चे ऑफीसचे ड्रॉवर मधील ५,४५,०००/- रुपये रोख रक्कम ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने स्वतःचे फायद्याकरीता चोरुन नेली आहे म्हणून वगैरे मजकुरची फिर्याद दिल्याने अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. ८४७/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०५ (a), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा अकलुज पोलीस ठाणे कडील तपास पथक पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांचे नेतृत्ताखाली शोध घेत असताना अकलुज पोलीस ठाणे कडील पोलीसाना घटनेच्या ठिकाणी काही संशयीताचे सीसीटिव्ही फुटेज प्राप्त झाले होते सदरचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक चार चाकी वाहनाचा नंबर प्राप्त झाला तो नंबर व संशयीताचे फुटेज संपुर्ण देशातील पोलीसाचे वेगवेगळया व्हॉटसअॅप ग्रुपवर पाठविण्यात आलेले होते.


सापुतारा पोलीस ठाणे राज्या गुजरात यांना देखील सदरचे फुटेज पाठविण्यात आलेले होते सापुतारा पोलीस ठाणे हददीत नाकांबदी दरम्यान तीन संशयीत इसम मिळुन आल्याने व सीसीटिव्ही फुटेज मधील वाहन व इमस हे सदर इमसाशी मिळते जुळते असल्याने सापुतारा पोलीस ठाणे यांनी अकलुज पोलीस ठाणे येथे संशयीता बाबत कळविले आहे.

त्याप्रमाणे लागलीच मा. पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक सो ग्रा यांचे आदेशान्वये पोसई कदम व तपास पथक सापुतारा येथे खाना केले. सदर ताब्यात घेतलेल्या आरोपी नामे १) अनिलभाई रेवाभाई भांभोरे वय २७ वर्षे, २) मिथुनभाई रेवाभाई भांभोरे वय ३४ वर्षे दोघे रा. नाडेलगांव धुळ महोडी फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद राज्य गुजरात, ३) वकील तेजसिंग भांभोरे वय ३२ वर्षे रा. अंबाली खजुरीया शिमोडा, फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद राज्य गुजरात यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथकाने तपास केला असता, आरोपीनी सदरचा गुन्हा अकलुज येथे केलेल्या कबुली दिली असुन सदर गुन्हयात चोरी केलेला एकुण ५,४५,०००रु/- रक्कमे पैकी ५,१३,१८० रु/- हस्तगत केली असुन गुन्हया करताना वापरलेले वाहन हुंडाई केटा कार क्रमांक GJ-20CB-2646 जप्त केलेले आहे.

सदर आरोपीना ताब्यात घेवुन अकलुज पोलीस ठाणे येथे आणुन त्यांची ५ दिवस पोलीस कोठडी मा न्यायालयाकडुन मंजुर करुन घेनुन आरोपीकडे अधिकचा तपास केला असता यांनी अश्याचे प्रकारे सांगोला पोलीस ठाणे हददीत चोरी केल्याची कबुली दिली असुन त्या गुन्हयात चोरी केलेल्या चांदीचा मुददेमाल देखील आरोपीतांकडुन जप्त करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयातील आरोपीनी गुन्हा करताना वापरलेली वाहन हुंडाई केटा कार क्रमांक GJ-20CB-2646, तीन मोबाईल, एक लोखंडी कटावणी, एक काळया रंगाची बॅग, एक लोखंडी पक्कड असे एकुण २०,३६,६८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अकलुजचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम व पो. हवा. विक्रम घाटगे, पो. हवा. विनोद साठे, पो. हवा. सुहास क्षिरसागर, पो. हवा. शिवकुमार मदभावी, पो.हवा. आभिजीत कुंभार, पो.कॉ. रणजित जगताप, पो.कॉ. दत्तात्रय खरात, पो.कॉ. सोमनाथ माने, पो.कॉ. पंडीत गवळे तसेच सायबरचे पो. हवा. तांबोळी यांनी कामगिरी केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा