*विशेष--- प्रतिनिधी*
*राजू ----मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो--84088 17333
कमी मतदानाचे चित्र बदलण्यासाठी मतदान सक्ती करणारा कायदा करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. रामदास आठवले यांनी वांद्रे पूर्वकडील गांधीनगर येथे सहकुटुंब मतदान केलं. पत्नी सीमा आठवले, मुलगा जीत आठवले यांच्यासह त्यांनी मतदान केलं. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, मतदारांनी सुट्टी घ्यावी अन् मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केलं होते.
मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. लोकशाही सृद्ढ होण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. 80 ते 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होणे गरजेचे आहे. मात्र, मतदान 50 टक्के किंवा त्या दरम्यान होत असल्याने मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही आठवले यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा