*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभाग सोलापूर या विभागाने विधानसभा २०२४ आदर्श
आचार संहिता अनुषंगाने दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ ते ०६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ४८ गुन्हे नोंद
करून ४५ आरोपींना अटक करुन, (1 चारचाकी बोलेरो, 2 तीनचाकी रिक्षा व 6 दूचाकी) अशी एकूण ९
वाहनांसह एकूण अकरा लाख ऐंशी हजार चारशे शेहचाळीस रु. (११,८०,४४६/- रु.) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई मध्ये ३८७० लि. हातभट्टी रसायन, १५९२ लि. हातभट्टी दारु, ५८५ लि. ताडी, ७४.९८ लि. देशी दारु, १०.०८ लि. विदेशी दारु असा एकुण ६,१३२ लि. अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे
सदरची कारवाई . विजय सुर्यवंशी सो. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रसाद सुर्वे , संचालक (अं व द) महाराष्ट्र राज्य, मुंबई, . सागर धोमकर विभागीय उप- आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे तसेच भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कारवाई निरीक्षक, माळशिरस विभाग, सोलापूर या विभागाचे निरीक्षक . एस.जी.भवड, दुय्यम निरीक्षक माळशिरस, . बी.बी. नेवसे . एस.एस. भोसले, . आर.डी. भुमकर, सहा. दु.निरीक्षक एस.एस. बिराजदार जवान टी.एच. जाधव, जी.एस. जाधव, पी.डी. पुसावळे, डी.ए. चौधरी, के.ऐ. गोळे, जवान नि. वाहन चालक एम.एस. जडगे राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभाग सोलापूर, यांनी सहभाग घेतला.
तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैद्य मद्य निर्मीती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८००८३३३३३३ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्र. - ०२१७/२३१२३७६ वरती संपर्क साधावा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा