*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकर्यांचे कमी खर्चात दुप्पट उत्पन्न तपासूनच करण्याचे काम कृषि विभागाने प्लॅग स्लिपवर घेतलेले आहे.याचाच एक भाग म्हणून मजूरीचे वाढलेले दर व वेळेवरील मंजूर उपलब्ध होत नाहीत.यावर मात करून कमी खर्चात वेळेवर,उपलब्ध पाण्याचा वापर करून जिरायत बागायत व उशिरा पेरणीसाठी व ५५ ते ६० सेमी उंच वाढणारी जमिनीपासून १ फुटाचे वर घाटे लागणी कंबाईन हार्वेस्टरने काढणी मळणी करता येणारी अधिक उत्पन्न देणारी,मध्यम आकाराची व मर रोगास प्रतिकारक महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली फुले विक्रम वाणाची लागवड करण्याचे शेतकरी बांधवांना अहवान करण्यात येत आहे.
माळशिरस तालुक्यात सरासरी पेक्षा ५०% कमी पाऊस झाला आहे व तालुका दृष्काळग्रस्त आहे अशा परिस्थितील उपलब्ध १-२ संरक्षीत पाण्याचा वापर करून रब्बी हंगामासाठी हरभरा पीक हा एकमेव चांगला पर्याय उपलब्ध आहे.फुले विक्रम ही ची पेरणी जिरायतसाठी नोव्हेबर पहिला आठवडा व बागायतसाठी २० ऑक्टो ते ३० नोव्हेंबर व उशिरा पेरणीसाठी डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत केली तर अपेक्षीत व किफायतशीर २१ क्विंटल उत्पन्न देणारा वाण आहे.पेरणी शक्यतो दोन चाडेपाभर ने किंवा बी.बी.एफ ने ३०x १० सेमी वर हेक्टरी ६५ ते ७० किलो बियाणे घेऊन बियाणेस ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाणेस मर रोग प्रतिकार व प्रतिबंधसाठी करावी. २५० ग्रॅम रायझोबीएम प्रति १० किलो बियाणेस प्रक्रिया केल्याने १०-१५ % उत्पनात वाढ होते. पेरणी वेळी अपेक्षित उत्पन्न व खर्च कमी करणेसाठी सरळ खताद्वारे हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ३० किलो पालाश पेरणीवेळी पाभरीने द्यावे. उपलब्ध पाणी आधारे तुषार सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाणी बचत होऊन मर रोगाचे प्रमाण कमी होते.एकात्मिक किड नियंत्रणमध्ये घाटेअळी नियंत्रणसाठी कमी खर्चीक टी आकाराचे पक्षी थांबे,हेलिओथिस ल्यूर्सचे काम गंध सापळे व ५% निबोळी अर्क फवारणी केल्याने अळीचे नियंत्रण होते.अशा प्रकार उपलब्ध पाणी वापरून अधिक उत्पन्न देणारी फुले विक्रम लागवड करण्याचे व अधिक महितीसाठी नजीकचे कृषिसहायक व कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवहान सतिश कचरे,मंडळ कृषी अधिकारी अकलुज यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा