*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
्
सोलापूर जिल्हातील सर्व नागरिकांना याव्दारे कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2024 अनुषंगाने दिनांक 15/10/2024 पासुन ते दिनांक 25/11/2024 रोजी पर्यंत आदर्श आचारसंहितेचा अंमल असुन सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणुक - 2024 चे मतदान दिनांक 20/11/2024 रोजी व निकाल दिनांक 23/11/2024 रोजी जाहीर होणार आहे. तरी कोणीही नागरिक सोशल मिडीयाव्दारे फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉटसअप ग्रुप व इतर तत्सम अॅप्लीकेशनच्या माध्यमाव्दारे कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी स्टेटस, डिजीटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाव्दारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डिजे वाजवू नयेत, फटाके फोडणार नाही, रंग, गुलाल उधळणार नाही. संबंधीत विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करु नयेत. व्हॉटसअप ग्रुपचे अध्यक्ष यांनी दिनांक 15/10/2024 ते दिनांक 25/11/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटींगमध्ये "Only Admin" करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकरणार नाहीत, जर सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्याला व Admin) यांना जबाबदार धरून योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण
पोलीस मदतीसाठी संपर्क क्र. 112 पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 02172732000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा