*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुलदीप उर्फ धीरज भैय्या आप्पासाहेब पाटील यांच्या प्रचारात रणरागिनी मैदानात उतरल्या असून कुलदीप धीरज भैय्या पाटील यांच्या अर्धांगिनी डॉ. शुभांगी धीरज पाटील आणि धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या धर्मपत्नी संयोजनी ओमप्रकाश राजे निंबाळकर धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल ताई वडणे( पवार) कटके ताई, इत्यादी महिला दिनांक 12 नोव्हेंबर 2024 पासून मतदार संघात गाव भेट दौरा करत असून त्या मतदार संघातील 72 गावांना भेटी जेवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत त्यांनी आज त्यापैकी बेंबळी ,तोरंबा, बामणी, केशेगाव आदि गावात गावभेटी दिल्या आहेत प्रत्येक गावात भव्य पदयात्रेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून ,महाविकास आघाडीचे व पक्षाचे विचार मतदारासमोर मांडत असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत त्यामुळे या महिलांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या पदयात्रेत महाविकास आघाडीच्या महिला पदा अधिकारी कार्यकर्त्या व ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी होत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा