*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
कराड :- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला. तसेच राज्यात महाविकास आघाडीलाही मोठे अपयश आले. या सर्व परिस्थितीवर माध्यमांशी संवाद साधताना चव्हाण यांनी शंका उपस्थित केली आहे.
पृथ्वीराज म्हणाले, ' कराड दक्षिणसह राज्यभरात लागलेला निकाल निश्चितच धक्कादायक आहे. अशा निकालाची कोणालाही अपेक्षा नव्हती. शेवटी राज्यभरातील जनतेने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. लाट होती का काय, माहित नाही. परंतु, यात काहीतरी भानगड असल्याचे अनेक सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
३०-४० हजार मते आधीच मतपेटीत टाकून नंतर मतमोजणी चालू केली, असे वाटण्यासारखा हा निकाल आहे.
मात्र, नक्कीच हा मोठा सेटबॅक असून महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना एकत्र बसून यावर विश्लेषण करावे लागेल. राज्यात लागलेल्या निकाल नक्कीच धक्कादायक आहे. यावर सर्व सहकाऱ्यांशी बोलून अनेक तर्क वितर्कावर चर्चा करावी लागेल.आताच त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही', असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा