Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

*सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचा ६३ वा उस गळीत हंगाम शुभारंभ*


 

*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा ६३ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 

        कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ९ लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.सर्व मशिनरी गाळपासाठी सज्ज असून प्रतिदिवशी ८,५०० मे.टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी केले.

           या कार्यक्रमास अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते- पाटील,कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने- देशमुख,संचालिका,स्वरुपाराणी मोहिते-पाटील,संचालक लक्ष्मण शिंदे,सतीश शेंडगे,नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर,रामचंद्र सिद, विराज निंबाळकर,रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, अमरदिप काळकुटे,गोविंद पवार,सुभाष कटके,जयदिप एकतपुरे,रामचंद्र ठवरे,तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे,कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले,माजी संचालक सुरेश मेहेर,बाळासाहेब पवार (तरसे),भिमराव काळे,विजय माने-देशमुख,विजय हेगडे, महादेव घाडगे,मोहनराव लोंढे, धनंजय चव्हाण,राजेंद्र मोहिते, चांगदेव घोगरे,केशवराव ताटे, शिवाजी सिद,सुनिल एकतपुरे, महादेवराव चव्हाण,रामचंद्र चव्हाण व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे,बाळासाहेब माने- देशमुख,दत्तात्रय चव्हाण,धनंजय सावंत,सौ.हर्षाली निंबाळकर तसेच सभासद,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा