Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

"*अकलूजच्या अश्व प्रदर्शनात" वरदान" सर्वोत्कृष्ट ब्रीड, तर सर्वोत्कृष्ट अश्व "हंसराज" विजयी"*


 

*विशेष प्रतिनिधी*

 *राजू.  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्यावतीने आयोजित श्रीराम अश्व प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट ब्रीडरचा मान आ. धीरज विलासराव देशमुख यांच्या वरदान अश्वाला तर सर्वोत्कृष्ट अश्वाचा मानकरी ब्रिजेश पटेल यांचा हंसराज अश्व ठरला.विजयी अश्वांच्या मालकांना मा पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील,श्री मानसिंग राजे भोसले नागपूर डॉ. धवलसिंह मोहिते पाटील , मा.सौ उर्वशीराजे मोहिते -पाटील, कु ईलाक्षीराजे मोहिते -पाटील, कु निहानसिंह मोहिते -पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

अकलूज येथील धवल श्रीराम मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्यावतीने लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीराम अश्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रदर्शनाचा शुभारंभ सोलापूर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  जनसेवा संघटनेचे माणिकराव मिसाळ,आण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे,सतीश पालकर,सुधीर रास्ते,मयूर माने,नवनाथ साठे, रणजितसिंह देशमुख, भारत मगर, रघुनाथ साठे, राजाभाऊ गुळवे,अरुण शहाणे, विकास शिंदे,शेखर शेंडे,उपस्थित होते.या प्रदर्शनात राज्यासह संपूर्ण भारतातून १५९ अश्व सहभागी झाले. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात मिल्क टीथ फिली(आदंत बच्ची )देवकी-मालक ईश्वर बिराजदार (प्रथम),शिवगाथा-स्वप्नील पाथर(व्दितीय)खुबसुरत-राजन पटेल(तृतीय)देवयानी योगेश सोपल(चतुर्थ), मिल्क टीथ कोल्ट(आंदत बच्चा)टायसन-महेंद्र थोरात (प्रथम),रॉयलस्टार-पिनकिन बॅरोट(व्दितीय),टर्मिनेटर- केशव जोशी(तृतीय),शिवम-परीक्षित जडेजा,राणा-रोहित काळभोर,अवतार-जशराज दिवशे(चतुर्थ विभा गुन),हिंदकेसरी-साहिल चोंधे पाटील(पाचवा),टु टिथ फिली (दोन दात बच्ची)साईसबुरी-नितीन कोटे-पाटील (प्रथम),रामकिर्ती कैलास काळे(व्दितीय),रुप-सिद्धार्थ भंडारी(तृतीय),गौरी-प्रतीक पाटील(चतुर्थ),रुक्मिणी-आर्यन विभाते(पाचवा),टु टीथ कोल्ट(दोन दात बच्चा), मुस्ताक-वैभव पाटील(प्रथम),सर्जग-जहान व आराध्य (व्दितीय),अझीम-इंद्रजीत वरपडकर(तृतीय),वर्धन-धीरज देशमुख(चतुर्थ),कांता-गणपत सिंग कमल (पाचवा),मेअर रिंग(मादी)दिलखुशी-निलेश ढोरे पाटील(प्रथम),मन्नत समरशिंग पवार(व्दितीय),हेमा-स्वप्निल पांढरे (तृतीय),कैना-रोनक कुर्णावत (चतुर्थ), रुक्मिणी-आथर्व शिरोळे(पाचवा),स्टाॅलियन(नर) हंसराज ब्रिजेश पटेल(प्रथम),मुसा-इम्रान पटेल (व्दितीय),बादल-एम.एन.आर्विन(तृतीय),फताबक्ष-आजनान सौदागर(चतुर्थ),त्रिशुल महेश खाडे(पाचवा), ब्रीडर्स रामकिर्ती-कैलास काळे(प्रथम),मिराली-रिजवान पाटील(व्दितीय),खुबसुरत-राजन पाटिल (तृतीय),टायसन- महेंद्र थोरात (पाचवा) यांनी यश मिळविले.

पंजाबचे अनी गील,मुंबईचे हरेश पटेल,लातूरचे समीर राठी,बारामतीचे हर्षवर्धन तावरे व शशांक पवार,पुण्या चे रणजित खैर,अण्णा हराळे,विकास गोईमकर,राज तापकीर,सोहन मोरे,राजस्थानचे शांतनू खेमपुर, कर्नाटकचे प्रीतम पाटील,यांनी परीक्षकांचे काम पाहिले.आभार प्राचार्य शेख सर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा