*उपसंपादक --- नूरजहाँ शेख*
*टाइम्स ४५ न्यूज मराठी
दि. 28 व 29 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळगाव येथे संगम केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये संगम केंद्रातील पंधरा शाळांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये बाभुळगाव शाळेने विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले.
लंगडी स्पर्धा लहान गट मुली प्रथम क्रमांक,खो खो स्पर्धा लहान गट मुली प्रथम क्रमांक, लंगडी स्पर्धा मोठा गट मुली प्रथम क्रमांक,खो खो स्पर्धा मोठा गट मुली प्रथम क्रमांक,धावणे स्पर्धा लहान गट मुली १०० मीटर व २०० मीटर प्रथम क्रमांक :- कु. आयशा फिरोज मुलाणी, धावणे स्पर्धा लहान गट मुले १०० मीटर व २०० मीटर स्वराज बाबुराव यादव तृतीय क्रमांक अशा विविध स्पर्धेत बाभूळगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे व बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत
या सर्व विद्यार्थ्यांना बाभूळगाव शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी बापू पराडे,उपाध्यक्ष लालासाहेब नाना पराडे, बाभुळगावचे सरपंच धनाजी सुरवसे,शाळेचे माजी अध्यक्ष,सचिन पराडे व शिक्षक पाटोळे सर,उघडे सर,तळेकर सर,ऋषिकेश कुंभार सर,सौ. पूजा कुंभार मॅडम व सौ.प्रिया गोदाम मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या विजयी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा