Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

*लेखक- इंद्रजीत पाटील" आधार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2024' ने सन्मानित*

 


*उपसंपादक--नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी

लेखक इंद्रजीत पाटील आधार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार - २०२४ ने सन्मानित झाले.आधार सामाजिक प्रतिष्ठान,बाेरगाव,ता.तासगाव,जि.सांगली या संस्थेने अफलातून,अविस्मरणीय व आनंददायी कार्यक्रमात त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला.प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ.भा.म.साहित्य परिषद,शाखा विटाचे संस्थापक देवदत्त राजाेपाध्ये,माजी सभापती,पंचायत समिती,तासगावचे संभाजी पाटील,भाजप विसापूर सर्कल अध्यक्ष नवनाथ पाटील,आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशाेक पाटील,संचालक श्रीपाद जाेशी,माजी उपसरपंच संजय पाटील,जि.प.माजी सदस्य,सांगली वर्षा पाटील,ग्रामपंचायत सदस्य,दिपाली पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत हा बहुचर्चित व मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व राेख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.सदर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन साै.अर्चना लाड मॅडम् यांनी केले.तर आधारचे सर्वेसर्वा श्री.सुनिल लाड सरांनी उत्तम नियोजन केले.



अल्पावधीतच लेखक इंद्रजीत पाटील यांच्या शेलक्या बारा या कथासंग्रहास मिळालेला हा सहावा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.त्याबद्दल पंडितराव लाेहाेकरे सर,माधवरावजी कुतवळ,चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,संजय भड,अमाेल देशमुख व राकेश गरड यांनी त्यांचे विशेष काैतुक केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा