*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*पत्रकार----( सांगली )*
*मो:-8983 587 160
वाचकांनो सहज विचार करा.... तरुणांना नोकऱ्या* नाहीत,
तो बेरोजगार आहे, भारतात महाराष्ट्रात उद्योगधंदे. नाहीत, महागाईचा. कळस झालेला आहे, "EVM" च्या माध्यमातून जनतेचा गळा दाबला जातं आहे, भारतातील "गरीबीचा" उचांक होतं आहे, संविधान. नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक पाऊले उचलली जातं आहेत, परंतु भारतातील "युवक /तरुण" याबद्दल गंभीर आहे का ??? त्याला 2GB - 3GB डाटा देऊन जाणीवपूर्वक विकलांग केले जातं आहे का ???
नोकऱ्या नाहीत आपण बेरोजगार आहोत यासाठी तो प्रयत्नशील आहे का ?? उदरनिर्वाह चालण्यासाठी तो धडपडतो. आहे का ??? बारकाईने पाहा, तो स्वतः केवळ आपल्या "बाह्यविश्वात" व्यस्त आहे ,खुश आहे.कारण मोबाईल चा 2GB डाटा त्याला या बेरोजगारीतुन "बाहेरच" काढत नाही. 3GB डाटा त्याला नोकरी मिळवण्यासाठी "प्रयत्न" करायला भागच पाडत नाही.
25 वर्षांपूर्वी 10 वी 12 वी उत्तीर्ण झालेला, ग्रॅज्युएट झालेला मुलगा नोकरीं साठी धडपडायचा, "नोकरी" देणाऱ्या एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये अर्ज करायचा, उद्योग भवन मध्ये देखील अर्ज द्यायचा,आणि नोकरी मिळणे हा त्याचा "ध्यास" असायचा. आज काय चित्र आहे ??? आजचा युवक केवळ "चित्र" पाहण्यात गुंग आहे,सोशल मीडिया, व्हाट्सअप,फेसबुक,ट्विटर, रिल्स व्हिडिओ आदी "पाहण्यात" त्याचा संपूर्ण दिवस केंव्हा जातो हे त्याला कळत नाही.
आज प्रचंड बेरोजगारी वाढली आहे,महागाई "आग" ओकत आहे, शाहू -फुले - आंबेडकर. यांच्या पुरोगामी विचाराची "पायमल्ली" होतं आहे,जनतेवर सरकारकडून अन्याय होतं आहे,
पोलीस - प्रशासन. यांच्याकडून अपेक्षित कार्य घडतं नाही, महिलांचे शेकडो प्रश्न आहेत,महिलांवर अत्याचार- बलात्कार होतायेत ,मणिपूर मध्ये नग्नधिंड काढली जाते आणि आजचा तरुण शांत आहे??? त्याला "राग" येत नाही का ?? आपण षंड झालेलो आहे का ???
हे घृणास्पद प्रकार विसरण्यासाठी , तरुणांचा किंबहुना भारतातील जनतेचा "स्वाभिमान" चिरडण्यासाठी, गरिबी. /बेरोजगारी हे सर्व विसरण्यासाठीच 2GB आणि 3GB स्वस्त. स्वरूपात दिले जातं आहे का ???
3 वर्षांपूर्वी जिओ ने
3 महिने फ्री डाटा दिला,त्यानंतर भारतातील 40% जनतेने जिओ सिम घेतले.त्यानंतर कालांतराने थोडे -थोडे पैसे घेत आज 2GB आणि 3GB डाटा. इतर कंपन्यांचा 800. रुपये पर्यंत गेला आहे.पण कुणाचाही त्याला "विरोध" नाही. डाटा किंमत वाढवली म्हणून कोणा युवकांनी मोर्चा काढलेला आपण पहिला आहे का ???
मित्रांनो मोबाईल वापरणारा तरुण पोटाला कमी खाईल परंतु मोबाईल चा डाटा हा 2000 रुपये झाला तरी तो डाटा घेणारच ! ज्यापद्धतीने गांजा/ ड्रग्ज याची नशा असतो तशी "लत" (सवय ) तरुणाईला मोबाईलच्या रूपाने लागलेली आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये.1947 साली देश स्वतंत्र करण्यासाठी ज्याप्रमाणे क्रांतिकारांनी क्रांती केली, प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्ष केला,आपल्या प्राणांची "आहुती" दिली, बलिदान दिले ,अगदी तिचं परिस्थिती आपल्या भारतावर आली आहे. सर्वांची मुस्कटदाबी होतं आहे, खरी लोकशाही EVM च्या माध्यमातून " नष्ट "केली जातं आहे. मित्रांनो जागे व्हा..मोबाईल सोडून जीवनाचा "यथार्थ अर्थ" आणि संवेदना ,वास्तव. याचा शोध घ्या ! संघर्ष करा, जागे व्हा.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.
*मोबाईल - 8983587160*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा