Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ डिसेंबर, २०२४

*महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालात घोटाळा?--- अर्थतज्ञ, परकला प्रभाकर*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

मुंबई : विरोधकांकडून ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला जात असतानाच आता केंद्रीय अर्थमंत्री व भाजपच्या एक प्रभावी नेत्या निर्मला सीतारामन यांचे पती व अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनीही निवडणूक निकालात घोटाळा झाला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी मतांच्या टक्केवारीचं गणितच मांडलं आहे.


परकला प्रभाकर एका वेब पोर्टलला मुलाखत देताना म्हणाले की, मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के होती. ही जवळपास ५ कोटी ६४ लाख ८८ हजार ०२४ मतं होतात. त्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी थेट ६५.०२ टक्क्यांवर पोहोचली. हा आकडा जवळपास ६ कोटी ३० लाख ८५ हजार ७३२ इतका आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० यादरम्यान मतांच्या एकूण संख्येत तब्बल ६५ लाख ९७ हजार ७०८ मतांची वाढ झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा