*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
एकमेकांना शिव्या देणे म्हणजे एक विकृत पणाच आहे आणि.. हे अनेकदा भांडण होण्याचं मूळ कारण असतं. मात्र आता या शिव्या देणाऱ्यांवरच दंडात्मक कारवाईचा निर्णय ग्रामपंचायत सौंदाळा ता. नेवासा जि.अहिल्यानगर येथील गावाने हा निर्णय घेतला असून या निर्णयाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते. आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्याचा ठराव यावेळी ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या ठरावानुसार जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुष-
यांनी गावामध्ये यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर पाचशे ५०० दंड सक्तीने आकारण्यात येईल. शिव्या देताना आईचा आणि बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अवयवा संदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो. हे आपल्या संस्कृतीत नाही
त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यासाठी बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान केला असल्याचं सरपंचांनी स्पष्ट केलं आहे. माझ्या पंधरा वर्षाच्या कालावधीत या निर्णयासह अनेक धोरणात्मक ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सौंदाळा गावचे लोकनियुक्त सरपंच -"शरद अरगडे" यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा