*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी माळशिरस पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना घरात घुसून काठीने मारहाण करून खिशातील ५०००/- रोकड जबरदस्तीने काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली.ही घटना गुरुवार दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वा.१०मि.च्या सुमारास माळशिरस येथील पंचायत समिती वसाहतीत घडली आहे. आबासाहेब हरी पवार असे मारहाण झालेल्या गटविकास अधिकारी यांचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल दादासाहेब पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची सविस्तर माहिती अशी की,अमोल बाबासाहेब पाटील हे जिल्हा परिषदमध्ये सेवेत असून ते नेमून दिलेली कामे व्यवस्थित करत नव्हते या कारणामुळे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करून त्यांना नोकरीवरून कमी केले होते. याचा राग मनात धरून काल सायंकाळी त्यांनी गटविकास अधिकारी यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत काठीने मारहाण करून जखमी केले तसेच त्यांच्या खिशातील जबरदस्तीने ५०००/- रुपये रोकड रक्कम काढून घेतली.तुमच्यामुळे माझी नोकरी गेली जर मला परत कामावर घेतले नाहीत तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही तसेच येथे कसे नोकरी करतो तेच पाहतो असे धमकवल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा