*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
टी.एम.जी.क्रिएशन्स व इनाेव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक इंद्रजीत पाटील,साेलापूर यांना साहित्यक्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी ' राज्यस्तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार - २०२४' ने बहारदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना अनुभूती महागाैरव संमेलनात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.मा.माेहन राठोड मा.पाेलीस महानिरीक्षक,आय.पी.एस,मा.कर्नल रवींद्र त्रिपाठी,सचिव,फाेरम फाॅर इंटीग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी,मा.नयना आपटे,ज्येष्ठ अभिनेत्री,मा.डाॅ.शुभदा नील,मा.डाॅ.सारिका नवाब,सहर,मा.अभंग कुमार,बाॅलीहूड व टाॅलीहूड अभिनेता,मा.अल्ताफ दादासाहेब शेख,लेखक व दिग्दर्शक,वर्ल्ड रेकॉर्ड विजेता यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा हा पुरस्कार कवी सुभाष नाईक,सिंधुदुर्ग यांनी स्वीकारला.हा कार्यक्रम मुंबई या ठिकाणी पत्रकार भवन,वातानुकूलित सभागृहात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गीताश्री नाईक व याेगिनी दुराफे यांनी केले.तर या संमेलनाचे आयोजन एन.खान सर व साै.सलमा.एन.खान,समन्वयक डाॅ.विजय माेरे,डाॅ.शैलेंद्र पवार,विलास देवळेकर,ईशा शेख,विजय भाेसले,नेहा गवळी,राजकुमार ताकमाेगे,दीपक कदम,प्रतिभा कीर्तकर्वे यांनी केले.साहित्यिक इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत असून एकूण साहित्य सेवेसाठी मिळालेल्या या पुरस्काराठी सर्व मित्रवर्य,नातेवाईक व बार्शी तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा