Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

*आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्या मुलांसाठी कारागृहाच्या शिक्षेचा कायदा व्हावा---इक्बाल बाबासाहेब मुल्ला, सांगली*

 


*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी

काल परवाच एका दैनिकात वृद्धाश्रमाची" एक जाहिरात पाहिली. एका वृद्धाला "सांभाळण्यासाठी" महिना 10,000 घेतले जाईल. आणि "कायमस्वरूपी" सांभाळण्यासाठी 1.5 लाख (दिड लाख ) रुपये घेतले जातील.ही जाहिरात वाचून मी काहीकाळ "स्तब्ध" झालो ,निशब्द झालो.

पाळणाघरात मुलांचा व्यवस्थित "सांभाळ" होईल अथवा न होईल या भीतीने नोकरी. करणारी आई पाळणाघरात न ठेवता स्वतःच्या नोकरीचा त्याग करत , प्रसंगी त्यावर पाणी. सोडत मुलांचा "हाताच्या फोडाप्रमाणे" सांभाळ करते, आईचे "बोट" धरून चालायला शिकणारा तोच मुलगा आईच्या म्हातारपणी तिला वृद्धाश्रमाचे बोट दाखवतो, ज्या वडिलांनी "काबाडकष्ट" करून गरिबीचे चटके झेलत मुलाला मोठे केले तो मुलगा मोठा झाल्यावर वडिलांना वृद्धाश्रमाची "वाट" दाखवतो, जन्म दिलेल्या आई - वडिलांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्या अशा "निष्ठुर" मुलांवर गुन्हा दाखल होऊन कारागृहात शिक्षेचा कायदा व्हायला हवा. 

माणुसकीची निष्ठुर हत्या करणाऱ्या अशा मुलांना "शिक्षा" व्हायलाच हवी. तरुण असताना वडिलांचा प्रावोडेड फंड घेऊन/ आयुष्यभराची कमाई घेऊन, लाखो रुपये. घेऊन "व्यवसायात" स्थिरस्थावर झालेली मुले आईवडिलांच्या वृद्धपकाळात त्यांना घराबाहेर काढल्याची अनेक उदाहरणे आहेत.

*वृद्धाश्रमाच्या भिंती तोडा !* 



 एक घडलेली घटना डोळ्यात "अंजन" घालणारी ठरावी. एक आई वृद्धाश्रमात मृत्युशय्येवर होती.तिने मुलाला "भेटण्याची" इच्छा व्यक्त केली.मुलगा आला, आईने सांगितले बाळा या वृद्धाश्रमात 4 पंखे आणि एक फ्रिज लाव. फार त्रास होतो.मुलगा म्हणतो आई आधी का सांगितले नाही ,मी आधीच पंखे व फ्रिज आणले असते . आई म्हणते, बाळा फ्रिज व पंखे माझ्यासाठी नव्हे तर तुझ्यासाठी मागवतेयं. कारण तुलादेखील मुले आहेत.तू म्हातारा झाल्यावर तुलादेखील तुझी मुले "वृद्धाश्रमात पाठवणार. तेंव्हा तुला त्रास. नको म्हूणन तुझ्यासाठी हें सांगते. आईचे हें बोल ऐकून मुलाला "धक्का" बसला.

ज्याप्रमाणे झाड जीर्ण होते त्याप्रमाणे आई -वडील म्हातारे झाल्यावर त्यांचे हात थरथरतात, ते धडपडतात, लहान असताना ज्या आईने -वडिलांनी मुलाला 50 वेळा हा चंद्र आहे असे सांगितले असते परंतु म्हातारपणी आई -वडिलांना कानाला ऐकू कमी येते . आई वडिलांनी दोनदा प्रश्न केला तर मुले हिडीसफिडीस करतात , आईवडिलांना मारतात आणि शेवटी वृद्धाश्रमात डांबतात. त्या मुलाची पत्नी. ही देखील आई -वडिलांचा वृद्धाश्रमात जाण्यास "भाग" पाडते का ?? आई - वडिलांचा त्रास नको म्हणून सुनेने सासू -सासऱ्यांना वृद्धाश्रमात डांबले असल्याची तुरळक उदाहरणे आहेत.असो,

या नालायक मुलांच्यामुळे आई -वडिलांना नियतीने नको असणारी वृद्धाश्रमाची "शिक्षा" दिलेली असते. आणि हतबल आई - वडील हें दुर्दैवाने "गुन्हेगार" ठरलेले असतात. त्यामुळे याबाबतीत कायदा व्हायला हवा.



*अनाथाश्रम - वृद्धाश्रम "एकत्र" असावे!*        

                   वृद्धाश्रमात आई -वडिलांचा वेळ जातं नसतो. अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम एकत्र असावे .जेणेकरून वृद्धांचा विरंगुळा होईल आणि मुलांना आपण वृद्धाश्रमात असणाऱ्या वृद्ध लोकांच्या "त्रासाची" कल्पना येईल. त्याशिवाय मुलांना त्यांची "काळजी" घेणारे,प्रेम करणारे आज्जी - आजोबा भेटतील. व ती मुले मोठी झाल्यावर समाजप्रबोधन करतील .आणि निदान त्या एका मुलामुळे एखादे आई - वडील तरी या "वृद्धाश्रमात" येण्यापासून वाचतील. 

समाजातील "सुजाण" लोकांनी महिन्या दोन महिन्यात एखाद्या वृद्धाश्रमात आवर्जून "भेट" द्यावी.कारण हें वृद्ध लोक प्रेमाचे - मायेचे भुकेले असतात. जे त्यांच्या पोटच्या मुलाने हिरावलेले असते. निदान तुमच्या वाढदिवसानिमित्त तरी वर्षातून एकदा भेट द्या. त्यांचे "आनंदाश्रू" आणि 'आशीर्वाद" निश्चितपणे तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही . धन्यवाद !


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा