Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

*भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांचे निधन*


 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

माळशिरस तालुका भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते विठ्ठलराव कृष्णाजी शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.ते ८० वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.माळशिरस तालुक्याच्या राजकारणात सुरवातीपासून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्य केलेले ते नेते होते.त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

          विठ्ठलराव शिंदे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन माळशिरस तालुक्यात पक्षासाठी अतिशय सक्रिय कार्य उभे केले आहे.आजच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांचे कार्य  व पक्षाप्रती असणारी श्रध्दा आणि निष्ठा सदैव प्रेरणादायी ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा