संविधान शिल्पकार
बाबासाहेबांनी दिला
समतेचा अधिकार
दूर केला सर्वांचाच
अज्ञानाचा अंध:कार
दया त्यांच्या मनी सदा
जगातील ज्ञान जास्त
हयातीत पाळलेला
माणुसकी धर्म फक्त
मुखावर सदा हास्य
जगी केले त्यांनी नाव
आकर्षित करी गुण
काळानेच केला घाव
सहा डिसेंबर रोजी
सोडूनिया गेले प्राण
संविधान शिल्पकार
भिमा आहे अभिमान
बाबा परत या पुन्हा
आहे गरज देशाला
तुमच्याच असण्याची
करी विनंती तुम्हाला
ॲड.फरहीन खान पटेल
उमरगा (धाराशिव)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा