*कोडोली --प्रा.विश्वनाथ पाटील*
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित प्रथम वर्ष वर्गाच्या शैक्षणिक साधननिर्मिती स्पर्धेत पृथ्वीराज जयवंत केकरे याने सर्वसामान्य विजेतेपद पटकावले. हिंदी विषयाची प्रतिकृती व इतिहासाचे चित्र या दोन्ही प्रकारांत त्याने प्रथम क्रमांक पटकावले.
महाविद्यालयाचा शैक्षणिक तंत्रविज्ञान कक्ष, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि सृजनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले होते. येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी व्यवस्थापक ( कै. ) प्रदीपबाबा यशवंत पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
प्रदर्शनाच्या प्रारंभी ( कै. ) प्रदीपबाबा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन स्पर्धेचे परीक्षक यवलुजच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील ख्यातकीर्त शिल्पकार के. एस. कुंभार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. ललित कला विभागप्रमुख प्रा. प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अश्विनी शामराव पाटील यांनी प्रास्तविक केले. दीक्षा देसाई यांनी आभार मानले. सौरभ राजेश झेंडे यांनी सूत्रसंचलन केले.
यानिमित्ताने स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सविस्तर निकाल असा:
प्रतिकृती -
विज्ञान -(अनुक्रमे प्रथम, व्दितीय , तृतीय क्रमांक ) : कोमल बेनाडे, महिमा इंगवले, संजय मोहिते.
गणित:- प्रीती रेवणकर, आयेशा पिरजादे, शिवानी पाटील.
इतिहास: - स्वाती पाटील, पुनम चव्हाण ,भाग्यश्री पवार.
भूगोल: - प्रियांका स्वामी, राणी सूर्यवंशी , श्रावणी बुरांडे.
मराठी:- अश्विनी शामराव पाटील.
हिंदी:- पृथ्वीराज केकरे .
सपाट चित्र :-
विज्ञान - धनश्री पाटील, प्रमोद काळे, सोनाली पाटील .
गणित - वर्षा मुगडे, मोनिका निकम - पाटील, पुजा मोरे.
इतिहास - पृथ्वीराज केकरे, अश्विनी पाटील.
इंग्रजी - भाग्यश्री पवार, सरिता कुंभार , शिल्पाताई पाटील.
मराठी - सुवर्णा पाटील, सौरभ झेंडे , साई नलगे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा