*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
ॲड.फरहीन खान पटेल यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ॲड.फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा या ठिकाणी अधिवक्ता आहे.सन 2012 पासून त्या वकिली क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच कायदेविषयक शिबिरामार्फत सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे कार्यक्रम तसेच अंगणवाडी,शाळा, महाविद्यालय, बचत गटातील महिलांचे कार्यक्रम तसेच महिलांशी संबंधित इतर कार्यक्रम इ.अश्या सर्व प्रकारच्या वरील घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे हक्क जबाबदाऱ्या तसेच उज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण,सशक्तिकरण, सबलीकरण आणि जागरूकता आणण्याचे कार्य करीत असतात.तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लेख, व्याख्यान माध्यमातून त्यांचे विचार जन माणसापर्यंत पोहोचविणे व विविध विषयावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत असतात.तसेच विविध विषयांवर स्वरचित काव्य लेखन करून आपले विचार मांडत असतात त्यांच्या कार्याबद्दल दखल घेऊन शांतिदूत परिवारातर्फे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार,वनश्री पुरस्कार, ग्रामपंचायत कार्यालय दाबकाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार काव्य लेखन ई- पुरस्कार,लेखणी रत्न साहित्य ई- पुरस्कार तसेच राज्यस्तरीय महाराष्ट्र युवा नारीशक्ती भूषण पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
अव्यक्त अबोली साहित्य परिवार आयोजित सहावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पुस्तक प्रकाशन व पुरस्कार,बक्षीस वितरण सोहळा. सिद्धार्थ नवयुवक वाचनालय आंबेडकर नगर, पुलगाव ता.देवळी जिल्हा.वर्धा दि.22 डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला.संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रविंद्र गिमोणकर (ज्येष्ठ कवी साहित्यिक )उद्घाटक कपिल कलंभे (पॉवर ग्रीड देवळी) स्वागताध्यक्ष संगीता शहाकार आयोजक जयश्री चव्हाण (संस्थेचे अध्यक्ष)योगेश ताटे (संस्थेचे सचिव) मार्गदर्शक अभि.मनोहर शहारे,सिंहल मेंढे,प्रांजली काळबेंडे,प्रा.डॉ.भूषण रामटेके,प्रमुख अतिथी बाबाराव तूराळे,निरज आत्राम,पद्माकर अंबादे,अल्का चौकीकर सर्व मान्यवर उपस्थीत होते. ॲड.फरहीन खान पटेल यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेचा तिसरा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के, राजेश नागुलवार यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा