Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

*बार्शी येथे 'क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले '--"गुणवंत शिक्षक पुरस्कार 'सोहळा संपन्न*

 


*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी

"क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले" गुणवंत' -शिक्षक पुरस्कार '-सोहळा उत्साहात संपन्न झाला

    महात्मा फुलेच्या विचाराने सामाजिक एकोपा जपणारे संभाजी ब्रिगेड बार्शीच्या टीमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार -'अभिजीत पाटील' यांनी यावेळी केले




    संपूर्ण राज्यांमध्ये व देशांमध्ये सध्या जातीय व धार्मिक तेढ किंवा देश पसरवणारे लोक आक्रमक झालेली असताना त्यांचे काम महाराष्ट्रामध्ये विष पेरणी सारखं चालू असताना बार्शीतील संभाजी ब्रिगेड ची टीम सामाजिक सलोखा राखण्यासाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारासारखा पुरस्कार सोहळा आयोजित करून शाहू फुले आंबेडकरांचा विचार समाजामध्ये रुजवण्याचे काम करत असतील तरी या सर्व टीमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मला जो काय तुम्ही क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जीवनगौरव पुरस्कार दिला आहे त्याबद्दल देखील मी या संभाजी ब्रिगेड टीमचे मनापासून आभार मानतो हा पुरस्कार नसून या पुढच्या काळामध्ये माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे मी असं समजून इथून पुढच्या काळात महात्मा फुले शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने मिळालेल्या आमदारकीचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देखील मी बार्शी तालुक्यातील संभाजी ब्रिगेड ला व सर्व जनतेला देतो आपण सर्वजण मिळून इथून पुढच्या काळात शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजवण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास यावेळी मानेचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिला.

      या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस तानाजी ठोंबरे सर होते. विचार मंचावर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.संदीप तांबारे चेअरमन आयुष व्यसनमुक्ती केंद्र जामगाव प्रमुख उपस्थिती नवनाथ कस्पटे प्रगतशील बागायतदार, पंचायत समिती माजी सभापती लक्ष्मण बापू संकपाळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, अर्णव इंग्लिश मीडियम चे अध्यक्ष रवीशेठ कापसे यांच्यासह अनेक मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

     यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले मागील 14 वर्षापासून संभाजी ब्रिगेड क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा या बार्शी शहरांमध्ये आयोजित करून शिक्षकांच्या कामाचे कौतुक करते, सामाजिक संघटना ज्यावेळेस शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते त्यावेळेस शिक्षकांना देखील आधार वाटतो आणि जास्त उत्साहामध्ये शिक्षक बांधव हे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात त्यामुळे संभाजी ब्रिगेडने जो हा उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो इथून पुढच्या काळामध्ये शिक्षकांच्या सोबत तर उभाच राहणार पण संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेच्या पाठीशी देखील आमच्यासारख्या राज्यकर्त्यांनी उभा राहायचं कर्तव्य आहे त्यामुळे मी स्वतःच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार असे मत व्यक्त केले 

      कार्यक्रमाचे रूपरेषा सांगत असताना संभाजी ब्रिगेड चे- अध्यक्ष आनंद काशीद यांनी संभाजी ब्रिगेड ही सातत्याने उपेक्षित घटकांकरता रस्त्यावर उतरणारी संघटना आहे, त्याचबरोबर शेतकरी कष्टकरी विद्यार्थी नोकरदार यांच्याकरता आंदोलन देखील उभा करणारे ही संघटना असून सातत्याने आम्हाला झाल संघटना म्हणून जरी ओळखला जात असले तरी शिक्षणाशिवाय देशाचं व पिढीचे भविष्य नसल्यामुळे जे शिक्षण ज्या शिक्षकापासून विद्यार्थ्यांना मिळते त्या शिक्षकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं हे संभाजी ब्रिगेडचे कर्तव्य असल्यामुळे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा मागील 14 वर्षापासून आम्ही आयोजित करत आहोत या पुढच्या काळात देखील शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार बार्शी तालुक्यातील घराघरात पोहोचण्यासाठी आम्ही काम करणार आहोत असा विश्वास त्यांनी आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना करत असताना व्यक्त केला. 

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद भोंग यांनी केले तर कार्यक्रमा वेळी पुरस्कार वितरणाची प्रस्तावना खंडू डोईफोडे यांनी केले तर आभार बालाजी डोईफोडे यांनी व्यक्त केले 

     यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष बालाजी डोईफोडे, पांडुरंग घोलप, विक्रम बापू घाईतिडक, मनोज शिंदे, ईश्वर पोकळे, विशाल भुसारे, राम घोडके यांच्यासह सर्व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा