*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
-टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
-----आमदारकीस तीन वेळा निवडून येवून विजयाची हॅटट्रिक करणारे इंदापूर चे लोकप्रिय व कर्तबगार आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी नागपूर राज भवन प्रांगणात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताच राज्य, जिल्हा व तालुक्यात एकच जल्लोष झाला. इंदापूर व सोलापूर येथे फटाक्यांची जोरदार आतिषबाजी झाली तर नेते व कार्यकर्त्यांनी एकमेकास पेढे भरवत आनंद व्यक्त केला, या शपथविधी कार्यक्रमा साठी इंदापूर येथून प्रमुख कार्यकर्ते आदल्या दिवशीच नागपूर येथे पोहोचले होते. त्यामुळे इंदापूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आमदार दत्तात्रय भरणे मामा यांना मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार भरणे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत पक्षश्रेष्ठींनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांनी नागपूर गाठले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी आई वडील यांना स्मरून मंत्री पदाची शपथ घेताच नागपूर येथे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी सलग तीन वेळा पराभव करून आमदार भरणे हे राजकारणातील जायंट किलर ठरले आहेत.
प्रभावी जनसंपर्क, तालुक्याच्या विकासा साठी आणलेला ६ हजार कोटी रुपयांहून जास्त निधी, विकास कामांचा लावलेला धडाका, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवलेल्या सर्व शासकीय योजना, बेरजेचे राजकारण तसेच विनम्र, अभ्यासू व मनमिळावू स्वभाव यामुळे जनतेने त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा निवडून दिले. इंदापूर व करमाळा तालुक्यास जोडणाऱ्या भीमा नदीवरील सुमारे ४०० कोटी रुपयांचा पुलाचे सुरू झालेले काम, लाकडी निंबोडी पाणी पुरवठा योजने साठी मिळवलेली मंजुरी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची गढी, सुफी संत हजरत चांदशाहवली बाबा दर्गा संवर्धन करण्यासाठी आणलेला ४० कोटी रुपयांचा निधी, तालुक्यातील रस्त्यांची पूर्ण झालेली कामे, जंक्शन येथे मंजूर केलेली लघु औद्योगिक वसाहत आदी ठळक कामे करून आमदार भरणे यांनी लक्षवेधी कामगिरी केली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ते अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष, राज्याच्या धर्मदाय समितीचे सदस्य म्हणून केलेले कार्य, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोरोना महामारी मध्ये केलेले कार्य, मंत्री मंडळात सामान्य प्रशासन, बांधकाम, मत्स्य व पशू संवर्धन, वने आदी सात खात्यांचे राज्य मंत्री म्हणून दिलेले योगदान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात निश्चित समावेश झाला. त्यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून काम केले होते. मात्र आमदार म्हणून त्यांनी केलेले कार्यपाहून त्यांना कॅबिनेट मंत्री पदी अजित पवार यांनी बढ़ती दिली आहे. त्यांनी केलेले विकास कार्य लक्षात घेवून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे अशी मागणी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्यासह प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत तरंगे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष देवराज जाधव, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, विधीज्ञ सचिन राऊत, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ, युवक तालुकाध्यक्ष विधीज्ञ शुभम निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस नवनाथ रूपनवर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप वाघमारे, दीपक जाधव, अतुल व्यवहारे, आण्णासाहेब कोकाटे, श्रीकांत बोडके, दादासाहेब क्षिरसागर, नितीन सरवदे, संतोष सूतार आदींनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेवून आमदार दत्तात्रय भरणे यांचा मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्याने इंदापूर तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांनी एकमेकांना पेढे भरवले तर कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे सर्वप्रथम मंत्री भरणे यांचे अभिनंदन करण्याचा बहुमान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी संपादन केला. त्यामुळे ऐन थंडीच्या वातावरणात तालुक्याचे राजकीय वातावरण तापले आहे.
शपथविधीनंतर कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भारणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व एकनाथ शिंदे, पक्षाचे प्रदे-शाध्यक्ष सुनील तटकरे व सहकाऱ्यांनी आपल्या वर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला जाईल. राज्यातील सर्वसामान्य माणसांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द आहे. मी शेतकरी कुटुंबातून असल्याने इंदापूर तालुक्याचे प्रलंबित शेतीसाठी शाश्वत पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. इंदापूर तालुका राज्यातील आदर्श व आग्रगण्य तालुका म्हणून ओळखला जाईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. मिळालेल्या मंत्रीपदात इंदापूर करांचा सिंहाचा वाटा असून मंत्रीपदाचा राज्यात गौरव वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही नूतन कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिली.
---------------------------








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा