*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*सांगली*
*मो:-8983 587 160*
बुलढाणा मध्ये जिल्हाधिकारी यांनी चहाच्या कागदी कप वर बंदी घालण्याचा क्रन्तिकारी निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील सर्वच शहरात याची "अमलबजावणी" होण्याची दाट शक्यता असून कागदी तसेच प्लास्टिकच्या कपातील मायक्रो प्लास्टिक वितळून ते पोटात जाण्यामुळे कॅन्सर होतो याबद्दल कित्येक वर्ष शास्त्रज्ञ तसेच डॉक्टरांकडून आरोप होतं होते, परंतु आज बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार खात्याने यांनी कागदी तसेच प्लास्टिक कप वर बंदी घालून प्राणघातक कॅन्सर पासून "जनतेचे" एकप्रकारे संरक्षण केले आहे. आणि कागदी कपाच्या कॅन्सर च्या शक्यतेवर शिक्कामोर्तब केले आहे हे सिद्ध होतं आहे. वास्तविक चहाचे कप बनवणाऱ्या कंपन्यांवरच "बंदी" घालण्यात यावी.जेणेकरून "बाजारात" विक्री करण्यासाठी हे कप येणार नाही.
चहाचा कप बनवताना त्यामध्ये बी.पी.ए.(BPA) नामक केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात होतं असल्याने गरम पाणी अथवा गरम चहा च्या संपर्कामुळे कागदी प्लास्टिक वितळते. आणि त्यामुळे त्याकपातील प्लास्टिकचे घातक कण चहात येतात.आणि तोच चहा आपण "आनंदाने" पितो.आणि प्रत्यक्षपणे कॅन्सरला निमंत्रण देतो.
बुलढाणा मध्ये सर्व शासकीय कार्यालये,शाळा - महाविद्यालये सार्वजनिक उपक्रम, महामंडळ ,सार्वजनिक संस्था यांना कागदी कपाच्या "बंदीबद्दल" कळवण्यात यावे असा आदेश काढण्यात आला आहे.
ऍड. सतीशचंद्र रोटे- पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जासंदर्भात बुलढाणा मध्ये हा आदेश काढण्यात आला आहे. मानवाच्या शरीरास अतिशय "धोकादायक" असणाऱ्या कागदी /प्लास्टिक चहाच्या कपाबद्दल प्रबोधन व्हायला हवे. जेणेकरून "जीवघेण्या" कॅन्सर पासून मनुष्य "सुरक्षित" राहू शकेल.
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा