Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

*हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभागी होणे काळाची गरज---' सतीश कचरे' मंडळ कृषी अधिकारी ,अकलूज*


 

*उपसंपादक - नूरजहाँ शेख* 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

सन २०२० - २०२१ ते २०२३ -२४ लागू असलेल्या हवामान आधारित पीक विमा योजनेचे शेवटचे वर्ष आहे. बदलत्या हवामान घटक अवर्षन , पावसाचा खड , अतिवृट्टी ' गारपीट इत्यापासून संरक्षण म्हणून फळपिका विमा उतरणे काळाची गरज आहे विविध हवामान बाबीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितित शेतकऱ्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी फळपिक विमा संरक्षणाची गरज आहे. सन २०२ ३ -२०२४ मध्ये महसुल मंडल मध्ये डाळींब केळी द्राक्ष ' आंबा ' पपई या फळपिकांचे २० हे उत्पादनक्षम क्षेत्र असेल तर या फळपिकासाठी ते मंडळ अधिसुचित करण्यात येऊन त्या फळपिकासाठी शासनाने हवामान आधारित फळपिक विमा योजना लागू केली आहे. यामध्ये डाळीब २वर्षे , आंबा -५ वर्षे 'द्राक्ष - २वर्षे ' पपई ९ महिने ' केळी १. २५ वर्षे उत्पादनक्षम वय असणे आवश्यक आहे. फळपिकांसाठी कुळाने ' भाडेपटटा व इतर सर्व शेतकरी या मध्ये बीगर कर्जदार यांना ऐच्छीक व कर्जदार शेतकरी यांना त्यांचे संमती ने स्वतः शेतकरी किंवा त्यांचे बँकेने फळपिक विमा पोर्टल वर WWW.PMFBY.GOV.IN वर मुदतीत जमा करायचा आहे. फळपीक धारक शेतकरी ४ हेक्टर मर्यादेपर्यत अधिसूचित मंडळमधील अधिसुचित १किंवा जास्त पिकाचा विमा भर शकतात . डाळींब सारख्या पिकाला मृग किंवा अंबिया बहार या पैकी एक हंगामसाठी विमा भरू शकतात . विमा भरणेसाठी वरील संकेत स्थळावर ७ /१२ '८ अ 'पीक लागवड स्वयंघोषणा पत्र 'आधार ' बैक पास बुक व फळबागेचा जिओ टॅगीग केलेल्या फोटो सह डाळींब साठी -१४ जानेवारी ' केळी व पपई साठी - ३१ ऑक्टोबर . द्राक्ष साठी - १५ ऑक्टोबर व आंबासाठी - ३१ डिसंबर पूर्वी विमा भरावयचा आहे. फळ पिके हवामान धोके कालावधी. विमा संरक्षित रक्कम व भरावयाचा विमा हाप्ता खालील प्रमाण ! १) डाळींब पीक - अवेळी पाऊस -१५ जाने ते ३१ मे ' जास्त तपमान - १ एप्रिल ते ३१ मे , गारपीट - १जाने ते ३० एप्रिल या हवामान धोकेसाठी १३०००० विमा संरक्षणासाठी विमा हप्ता १३००० रु प्रति हेक्टर भरावयाचा आहे. २ ) केळी पीक - कमी तपमान - १नोव्हे ते २८ फेब्रुवारी ' वेगाचा वारा - १मार्च ते ३१ जुलै ' जास्त तपमान - १ एप्रिल ते ३१ मे या हवामान धोके साठी १४०००० विमा संरक्षण असून ७००० रु प्रति हेक्टर विमा भरावयाचा आहे. या पीकात गारपीठ -१जाने ते ३० एप्रिल हवामान धोक्या साठी ४६६६७ विमा संरक्षण असून त्या साठी २ ३३३ अतिरिक्त विमा प्रति हेक्टर भरणे आहे. ३ ) द्राक्ष पीक - अवेळी पाऊस -१६ औक्टोबर ते ३० एप्रिल, कमी तपमान - १ डिसें ते २८ फेब्रुवारी या हवामान धोके साठी ३२०००० विमा संरक्षण असून १६००० रु प्रति हेक्टर विमा हप्ता भरावयाचा आहे. गारपीठ १ जाने ते ३१ मे कालावधीत हवामान धोकेसाठी १०६६६७ विमा संरक्षण असून या साठी ५३३३ विमा रक्कम प्रति हे अतिरिकत भरावयाची आहे. ४ ) आंबा पिक - अवेळी पाऊस - १जाने ते ३१ मे , कमी तापमान -१ जाने ते २८ फेब्रुवारी ' जास्त तपमान १मार्च ते ३१ मार्च यासाठी १४०००० विमा संरक्षण असून त्यासाठी १०५०० रु प्रति हेक्टर विमा रक्कम भराक्याची आहे. गारपीट १ फेब्रुवारी ते ३१ मे कालावधी मधील हवामान धोके साठी ४६६६७ विमा संरक्षण असून त्यासाठी २३३३ अतिरिक्त विमा रक्कम प्रति हेक्टर भरावयाची आहे. ५ ) पपई पीक - कमी तपमान-१ नोव्हें ते ३० एप्रिल, वेगाचा वारा -१ फेब्रुवारी ३० जून ' जास्त पाऊस व आर्द्रिता - १५ जून ते ३० सब्टेबर या कालावधीमधील हवामान धोके साठी ३५००० विमा संरक्षण असून त्यासाठी १७५० रु विमा हप्ता करावयाचा आहे. गारपीट - १जाने ते ३० एप्रिल या हवामान धोक्यासाठी ११६६७ विमा संरक्षण असून त्यासाठी प्रति हेक्टर ५८३ रु अतिरिक्त हप्ता भरणे आहे. प्रत्येक महसुल मंडळमध्ये स्वयंचालित हवामान केंद्र कार्यान्वीत आहे याचे हवा मान बाबी विश्लेषण होऊन पीक निहाय हवामान धोके कार्यान्वीत झालेवर विमा रक्कम विमा कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतिने संबंधीत लाभार्थी शेतकरी यांचे खातेवर विमा कंपनी जमा करते . गारपीट व वेगाचा वारा यामुळे नुकसान झालेस ७२ तासाचे आत विमा कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री नंबर १८०० ३००९रिलायन्स जनरल इन्शु रन्स कंपनी वर संपर्क करावा. अधिक माहिती मार्गदर्शन प्रश्न अडचणी साठी शेतकरी बांधवांनी नजीकचे कृषि कार्यालियांशी संपर्क करण्याचे अहवान मंडळ कृषि अधिकारी अकलुज यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा