*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहीम आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच राबविण्यात आली. विशेष सर्वेक्षणाच्या माध्यमातून वंचित, दुर्लक्षित असणारे ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार आदिंचे डॉक्टर, आरोग्य सहाय्यक व आशासेविका यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन शोध घेतला.
शाश्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत केंद्र शासनाने सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार हे उद्दीष्ठ निश्चित केले आहे. वरील ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व लपलेले कुष्ठरुग्ण शोधुन त्यांना बहुविध औषध उपचाराखाली आणणे आवश्यक आहे. याकरिता विशेष सर्वेक्षणामध्ये वंचित दुर्लक्षित राहणाऱ्या विटभट्टी कामगार, चाण कामगार, स्थलांतरित व्यक्ती, बांधकाम मजुर, निवासी, आश्रमशाळेत राहणारे विदयार्थी, कंपनीत काम करणारे कामगार इत्यादीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांनी मोहीमेचा सुक्ष्म कृती आराखडा तयार करून त्यानुसार सर्व कृती करून केलेल्या कामाचा अहवाल राज्यस्तरावरुन विहीत केलेल्या वेळेत कार्यालयास सादर करावयाचा आहे. कामाकरिता मजुरीकरिता लवकर घर सोडून उशिरा घरी परत येतात अशा व्यक्तीची आरोग्य तपासणी नियमित सर्वेक्षण अथवा कुष्ठरोग शोध मोहिमेमध्येही होत नाही. सध्यातरी अशा व्यक्तीच्या तपासणी करिता वेगळी यंत्रणा आस्तित्वात नाही. या मोहीमेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील जोखीमग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्यात आले असून, जोखीमग्रस्त ठिकाणातील सर्व व्यक्तींची कुष्ठरोग विषयक शारीरीक तपासणी करण्यात आली.
यामध्ये त्वचेवर फिकट, लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी धाम न येणे, जाड, बधीर तेलकट चकाकणारी त्वचा. त्वचेवर गाठी असणे कानाच्या पाळया जाड होणे. भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे. हाताची व पायाची बोटे वाकड़ी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोटयापासून लुळा पडणे. त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालतांना पायातून चप्पल गळून पडणे या लक्षणांचा शोध घेण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे पिंपरी बुद्रुक आरोग्य उपकेंद्रातील सर्व गावांत डॉ सुमित्रा कोकाटे, आरोग्य सहाय्यक सुरवडकर, प्रियंका पाटील, आशासेविका रफिया तांबोळी, पुष्पा ठोकळे, सारीका वाघमारे, स्वाती पाटील, सुरेखा क्षिरसागर, रुपाली चव्हाण, मालन जगताप, अश्विनी देवळे, विद्या देशमुख यांनी सर्व्हेक्षण केले.
फोटो - गणेशवाडी येथे ऊसतोड मजुरांची फडात जाऊन तपासणी करून शोध घेण्यात आला.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा