*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
-टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
-----राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी हे तमाम इंदापूरकरांचे श्रेय आहे. मिळालेल्या संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करण्यासाठी आपण कटिबध्द असून तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवून तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही नूतन क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारे आमदार दत्तात्रय भरणे यांची राज्य मंत्रीमंडळामध्ये क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्रालय खात्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दत्तात्रय भरणे यांचा येथील वाघ पॅलेस सभागृहात भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, प्रताप पाटील, मधुकर भरणे, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, श्रीमंत ढोले, वसंत मोहोळकर, देवराज जाधव, तुषार जाधव, प्रवीण डोंगरे, संदेश देवकर, अतुल झगडे, मच्छिंद्र चांदणे, अंकुश जाधव, शिवाजीराव मखरे, विठ्ठलराव ननवरे, वसंतराव मालुंजकर, धनंजय बाब्रस, बाळासाहेब ढवळे, श्रीधर बाब्रस, बाळासाहेब व्यवहारे, माऊली वाघमोडे, अरविंद वाघ, युवराज मस्के, विधीज्ञ शुभम निंबाळकर, नानासाहेब नरुटे, नवनाथ रूपनवर, गफुरभाई सय्यद, लक्ष्मण देवकाते, ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, सचिन खामगळ, शिवाजी तरंगे, हामा पाटील, सागर पवार, वसीम बागवान, प्रा. अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नामदार भरणे पुढे म्हणाले, इंदापूरच्या जनतेमुळे मला मंत्रीपदा ची संधी मिळाली असून तालुक्याचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील.
यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांची पावती जनतेने दिल्याने आमदार भरणे आता कॅबिनेट मंत्री झाले असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तालुका विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठेवला जाईल. मात्र विकास कामे करताना बूथ कार्यकर्त्यांना देखील विश्वासात घेतले जाईल.
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्री पदामुळे तालुक्याच्या वैभवात भर पडली असून आता तालुक्याच्या नियोजनबद्ध विकासास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून आमदार दत्तात्रय भरणे निरपेक्ष भावनेने काम करत असल्याने जनतेने तसेच नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना राज्यात देखील जनसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मंत्री भरणे या संधीचे सुवर्णसंधीत निश्चित रूपांतर करतील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविक हनुमंत कोकाटे यांनी तर सूत्रसंचालन सचिन देवडे यांनी केले. आभार बाळासाहेब ढवळे यांनी मानले.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा