Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

*शालेय जीवनात मुलांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढावी यासाठी मेडिटेशन महत्त्वाचे आहे --प्रा- धनंजय देशमुख*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

स्पर्धेच्या युगात शालेय जीवनामध्ये मुलांमध्ये करिअरमुळे ताणतणाव निर्माण होत आहेत हे ताणतणाव कमी होऊन मुलांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढावी यासाठी मेडिटेशन महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंग व आयुष मंत्रालय भारत सरकार मान्यता प्राप्त योग शिक्षक प्रा.धनंजय देशमुख(एम.ए योगशास्त्र) यांनी केले.    

       महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे २१ डिसेंबर  पहिला जागतिक ध्यान दिन साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर प्रा. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 



        प्रास्ताविकामध्ये प्राशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी बंगळुरू येथील येथील आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक पद्मभूषण श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रयत्नातून जागतिक मेडिटेशन दिनास संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिली आहे. नियमित मेडिटेशन मुळे तणाव कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीस मदत होते अशी माहिती दिली.



         या ध्यान सत्रामध्ये प्रा.देशमुख यांनी ध्यान म्हणजे काय? ध्यान का करावे? व कसे करावे याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शनही केले. उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांना ध्यानाद्वारे मन कसे शांत आणि उत्साही करता  येते तसेच एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग आणि मेडीटेशन कसे महत्त्वाचे आहे हे पटवून सांगितले.

   यावेळी विद्यार्थ्यांकडून सूक्ष्म व्यायाम, योगासने आणि  कपालभाती, अनुलोमविलोम, भस्त्रिका,भ्रमरी,ओंकार यासारखे

प्राणायाम करून घेऊन शेवटी अत्यंत शांततापूर्ण वातावरणात सुमधुर संगीताच्या सोबत मेडीटेशन/ध्यान घेण्यात आले.

      आभार पर्यवेक्षक  अंकुश एकतपुरे तर सुत्रसंचालन किरण सुर्यवंशी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा