Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

*मका लष्करी आळी व त्यावरील एकात्मिक नियंत्रण ---सतीश कचरे ,मंडळ कृषीअधिकारी- अकलूज*

 


*विशेष. प्रतिनिधी*. * *एहसान. मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9096 837 451

माळशिरस तालुक्यात मका पिकाखील सर्वसाधारण क्षेत्र ६३४५ हे क्षेत्र आहे . अलिकडे इतर खरिप व रब्बी पीकाचे क्षेत्र मका पिकाखाली वर्ग होत आहे त्याचे कारण म्हणजे हमी भाव 'मका खरेदी केंद्रे ' ग्रेन बेस अल्कोहोल फॅक्टरी खरेदी व मागणी ' वाढलेले पशुधन ' पोल्ट्री व औद्योगीक उपयोग (स्टार्च ) व कमी कालावधीचे पीक ' संकरीत जाती हे होय . मका सी -४ वर्गातील पीक असल्यामुळे चिबड जमिनी सोडता सर्व जमिनीत मशागत ' पाणी व एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापना चांगला प्रतिसाद देऊन ते अपेक्षीत उत्पदनात रुपांतर करते . मका पिकाचे सर्व पीक भाग उदा. ताट 'कणसे ' बुरुकुंडे ' मुळे सर्व उपयोगात येतात म्हणून त्या ला कल्प पीक संबोधले तर वावगे होणार नाही. मुरघास घास बनविण्यात यांचा ८०% वाटा असलेमुळे चाऱ्याचा मोठा वाटा आहे. मनुष्य प्राणी पशुधन पक्षी यांना अन्नाचा विचार करता प्रथीने 'कार्बोदके ' तंतुमय पदार्थ ' साखर ' सिग्ध पदार्थ . ६ प्रकारची व्हिटॅमिन्स . ७ प्रकारची सुक्ष्म अन्नद्रव्ये ( पशुधन ' मनुष्य ' पोल्ट्री उपयुक्त ) ही सर्व संतुलीत प्रमाणात उपलब्ध आहेत यामुळे लघवीचे विकार ' किडणी स्वछता व कार्यक्षमत व प्रतिकार शक्ती वाढविणे ' कॅन्सर प्रतिबंध ' मधूमेह निवारण ' पोट साफ होणे ' कॉल्सेटेरॉल कमी करणे 'रक्तक्षय रोखणारे ' डोळे व कातडीचे काळजी करणारे ' प्रतिकार शक्ती वाढविणारे ' हुदयाची काळजी करणारे अन्नधान्य पीक आहे. अशा या उपयुक्त पीकाला सन २०१७ - १८ पासून ७०% पर्यत नुकसान करणऱ्या लष्करी अळीने वेढा घातला आहे. म्हणून या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन बाबत उपाय योजने क्रमप्राप्त आहे ते आपन पाहूया !! जीवन क्रम - १ -या अळीचा पतंग पोग्याजवळ पानाचे वर व खाली १००० पर्यत अंडी पिवळी गुलाब सर घातली जातात त्याचे आयुष्य २ -३ दिवस असते . २ - या अंड्यातून उबवून अळ्या बाहेर पडतात त्याचे ६ वाढीच्या आवस्था असून डोक्यावर Y अकार व शेपटीवर ४ ठिपके हीओळख व त्या १४-१९ दिवस राहून सर्वात जास्त नुकसान या आवस्थेत करातात .३ . - पूर्ण वाढ झालेल्या आळ्या कोषावस्थेत जमिनित ४-५ सेंमी खोल जाऊन कोषावस्थेत जातात . अशाप्रकारे ही कीडी २६ -३५ दिवसात जीवनक्रम पूर्ण करते म्हणजे मका पीकात ३वेळा जीवन क्रम पूर्ण व अंड्याची संख्या यामुळे उपद्रव खुप मोठा व नुकसान टक्केवारी ही खुप मोठे असते . उपद्रव - अंड्यातून २ ते ३ दिवसात बाहेर आलेल्या अळ्या अन्नाच्या शोधात विखरून पाने खरडून खातत त्यामुळे पाने वर पांढरे लांबट चट्टे दिसून येतात मोठ्या प्रमाणावर प्रार्दुभाव झाला तर पनावर फक्त शिरा दिसतात . तिसर्‍या अवस्थेत अळी पोग्यात शिरून पाने खाते त्यामुळे पानावर छिंद्र दिसतात व पोग्यात मोठ्या विष्ठा दिसते . कणीस आवस्थेत ही अळी दाण्यावर उपजीवीका करते . अळी एवढी हुशार असते की एका ताटावरून दुसऱ्या ताटावर जाणेसाठी लाळ सोडून तार करते व त्यावरून दुसऱ्या पिकावर हल्ला करते . क्षेत्र /शेत निरीक्षण - शेतात w आकाराचे निरीक्षण करून प्रत्येक ओळीत ५ प्रमाणे २० रोपे व त्यावरी अंडी अळी व त्यांचे प्रादूभाव टक्केवारी नोंद खालील प्रमाणे करावी . १ -२ झाडे प्रार्दुभाव ग्रस्त असतील तर -१० % नुकसान पातळी . २ - उंगवणीनतर २ आठवडे रोप ते पोगा अवस्था - कामगंध सापळे - ३ पंतग - ५% प्रार्द्रू भाव . ३ - उगवणीनंतर ४ आठवडे पोगा ते मध्य पोगा अवस्था - ५ते १०% प्रार्दुभाव ग्रस्त . ४- ४ ते ७ आठवडे पोगा ते उशिर पोगा १० ते २० % प्रार्द्रूभाव असेल ५ - उशिरा पोगा ७ - आठवडे नंतर २० % प्रद्रूभाव ग्रस्त असेल ८ - तुरा ते पीक काढणी -१० % कणसे असतील तर लगेच उपचारात्मक उपाय योजावेत . किडीचे एकात्मीक व्यवस्थापन - १ प्रतिबंधात्मक - १ उन्हाळी हंगामात दिवसा खोल नागरट करणे . २ - फेरपालट मध्ये भूईमुग सुर्यफुल पीकाचा समावेश करावा . ३ - वेळेवर पेरणी करावी शक्यतो उशिराची पेरणी टाळावी . ४ - मका पीकाच्या बाजूने नेपीअर ग्रास या सापळा पीक व भोवती मटकी उडीद या पीकाची लागवड करावी . ५ - एकरी १० पक्षी थांबे लावावेत . ६ - स्पोडोपटेरा ल्युर्स चे हेक्टरी १५ कामगंध सापळे नर किटक अकर्षन मास ट्रॅपीग व प्रद्रभाव पातळी साठी लावावेत . ८- हेक्टरी -१ या प्रमाणे पंतग पकडणे साठी प्रकाश सापळे लावावेत . यामुळे किडीचे ९० % नियंत्रण होते . उपचारात्मक उपाय : - किडीचा ऑटब्रेक झाला व वरील प्रमाणे नुकसान टक्केवारी दिसून आले तर खालील उपाय करावेत . १- पोग्यात अळ्या दिसून आल्या तर माती + चुना ९:१ प्रमाणात मिश्रण टाकावे . २ - मेटेऱ्हायसिम अॅनीसोपली ५ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी . ३ - १५०० पीपीएम निमार्क अंडी व अळ्या नाशक फवारणी करावी यामुळे अंडी नपुसक होऊन अळी भुक मंदाऊन मरते . प्रथमतः हाय प्रोफाईल किटकनाशके वापरू नयेत सरतेशेवटी अळी साठी ४ - इमामेकटीन बेंझोएंट २ मिली प्रति लिटर फवारणी करावी . वरील सर्व कमी खर्चीक अळीचा प्रार्दुभाव कमी व प्रतिबंध करून हवा पाणी मनुष्य प्राणी पक्षी वार्तावरण पर्यावरण यांचेशी मैत्रीचे संबंध ठेवून आपन एकात्मिक व समुळ उच्चाटन करणे शक्य आहे त्यासाठी नियमित निरीक्षणे प्रार्द्रूभाव टक्केवारी अकलन करणे गरजेचे आहे. याप्रमाणे प्रतिबंधात्मक व निरीक्षणे आधारीत उपचारात्मक ९०% नियत्रण कमी खर्चाचे करणेचे अहवान मंडळ कृषि अधिकारी अकलुज यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा