*विशेष. प्रतिनिधी*
*राजू. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महाराष्ट्र विधानसभेत पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ' असे बदलण्याचा ठराव मंजूर केला आहे. पुढील आवश्यक कारवाईसाठी आणि विमानतळाचे नाव बदलण्यासाठी हा ठराव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे देखील विधानसभेत स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ११० अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव मांडला होता. पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे पुनर्नामकरणाचा शासकीय ठराव विधानसभेत मंजूर केला गेला आहे.
पुणे विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे नामकरण करावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा केली होती. आता राज्य सरकारकडून पुनर्नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा