उपसंपादक -- नूजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
चॅरिटेबल ट्रस्ट,महाराष्ट्र राज्य,डाकेवाडी (काळगाव), ता.पाटण,जि.सातारा या संस्थेने स्व.राजाराम (तात्या) डाकवे राज्यस्तरीय पुरस्काराने इंद्रजीत पाटील यांना सन्मानित केले.त्यांच्या ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहासाठी हा पुरस्कार त्यांना कराड या ठिकाणी देण्यात आला.प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रसंत पद्मभास्कर डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज,मंगेशजी चिवटे,कविता राम,विठ्ठल डाकवे,पंकज काळे,साै.संगिता साळुंके,साै.रेखा देशपांडे,गजानन तुपे,अमृता उत्तेरवार अशा राजकीय,सिने,गायन,पाेलीस,पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा महाराष्ट्रातील मानाचा व बहुचर्चित पुरस्कार पाटील यांना प्रदान करण्यात आला.शेलक्या बारा या कथासंग्रहास अल्पावधीतच मिळालेला हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार अाहे.स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री.संदीप डाकवे यांनी सदर कार्यक्रमाचे उत्तम आयाेजन केले.त्यामुळे कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.
लेखक इंद्रजीत पाटील यांनी घेतलेल्या या साहित्यिक भरारीबद्दल श्री.पंडीतराव लाेहाेकरे, माधवराव कुतवळ,चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,संजय भड,अमाेल देशमुख व राकेश गरड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा