*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
शाळा - महाविद्यालयात विनयभंग*तसेच अनेक प्रकार घडतात. चुकीचे प्रकार घडल्यास तात्काळ विरोध करावा लागतो.अन्यथा याचा "शेवट" दुर्दैवी होतो.
CCTV नाही म्हणून एखादा शिक्षक विद्यार्थिनींशी "चुकीचे" वागत असेल तर त्याला शिक्षा व्हायला हवी. म्हणूनच काही दिवसापूर्वी मी "लेख" लिहून शाळेत अथवा महाविद्यालयात असे जिथे प्रकार घडतात तेथील विद्यार्थिनी - शिक्षिका - महाविद्यालयीन संचालक मंडळ यांनी पुढाकार घ्यावा, पोलीस अधीक्षक कार्यालय -जिल्हाधिकारी कार्यालय अथवा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचेकडे "अर्ज" करावा अशी साद दिली होती
.
कधी कधी शाळा - महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला धोका पोहचू नये म्हणून सर्व बाबींचा "खुलासा" करायचा नसतो. जर "मेडिकल" च्या गोळ्यांनी आणि डॉक्टर च्या इंजेक्शन ने "जखम" "बरी" होतं असेल तर त्याचे ऑपरेशन करायची गरज नसते. तात्पर्य अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना न्याय मिळाला असेल,त्या शिक्षकाचे निलंबन झाले असेल आणि "वाईट प्रवृत्ती" शाळा - महाविद्यालयाच्या "बाहेर" गेली असेल तर विनाकारण खोलात जायचे कारण नाही.
आतातरी सर्व शाळा - कॉलेजमध्ये CCTV लागणार का ?? हा यक्षप्रश्न आहे.
सर्व तरुणी या आपल्या "मुली - बहिणी" आहेत या दृष्टीकोनातून शाळा - कॉलेज "व्यवस्थापनाने" गांभीर्याने विचार करावा.
माझ्या लेखणीने आतापर्यंत कित्येक लोकांना "न्याय" मिळाला आहे.
8 दिवसापूर्वी एका मेंदूच्या ऑपरेशन साठी एका टेलर साठी मदतीचे आवाहन मी केले होते. त्याला "मान" देऊन त्या व्यक्तीला 150000 रुपये मिळाले.
आजदेखील एक नव्हे तर शेकडो मुलींचे माझ्या एका लेखाच्या प्रबोधनाने " संरक्षण* झाले आहे. तात्पर्य निष्पक्ष आणि "धारदार लेखणीने" केलेले समाजप्रबोधन आणि प्रामाणिकपणे केलेली "निखळ पत्रकारिता" माझा "मानबिंदू" आहे. धन्यवाद !
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा