उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळीनगर येथील दि सासवड एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळा गट नंबर तीन च्या मुख्याध्यापिका ललिता प्रदीप नागटिळक यांना नुकतेच महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद सोलापूर यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे हा सोहळा पार पडला.ललिता नागटिळक या दि सासवड एज्युकेशन सोसायटी माळीनगर येथे १९९१ पासून सहशिक्षिका या पदावर कार्यरत असून १ जून २०२३ पासून त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या कामाची दखल घेऊन.त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
ललिता नागटिळक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल माळीनगर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गिरमे,सचिव अजय गिरमे, संचालक मंडळ व शिक्षक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा