Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ७ जुलै, २०२५

*सोसाट्याच्या वाऱ्याने घेतले दुचाकी मागे छत्री धरून बसलेल्या महिलेचे प्राण ---गाडीच्या साईडला बसून छत्री उघडणे अत्यंत घातक!*

 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला ( पत्रकार) सांगली.*

 *मो.8983 587 160

*सोसाट्याच्या वाऱ्याने घेतला "छत्री" घेतलेल्या महिलेचा बळी !* जीवन *क्षणभंगुर* आहे, हसत खेळत जीवनाचा अमानुष "अंत" होऊ शकतो. महाराष्ट्रातील *कोल्हापूर* येथे आणि सांगलीत देखील पावसामुळे *छत्री* उघडताना महिलांचा झालेला "मृत्यू" अंगावर *काटा* आणणारा ठरला आहे.

माझ्या एका "उदाहरणाने" एखाद्याचा "जीव" वाचावा म्हणून हा *लेखप्रपंच"* !

काही दिवसापूर्वी मुस्लिम धर्मियांमधील पवित्र *हजयात्रा* आटोपून आलेल्या एका कुटुंबावर *काळाचा* घाला पडला. "गोंडस" आणि गोड असणाऱ्या आपल्या नातवाला *शाळेमध्ये* सोडण्यासाठी *आज्जी - आजोबा* आपल्या नातवाला "शाळेत" सोडण्यासाठी निघाले होते. "पावसाच्या" सरी लक्ष वेधून घेत होत्या. बेफाम वारा मनाचा "थरकाप" करत होता. पाऊस येईल म्हणून आजी - आजोबा छत्री घेऊन मुलाला शाळेत चालले होते. पावसाने हजेरी लावली, त्यातच वाऱ्याचा "जोरही" वाढला.त्यामुळे आपल्या *नातवाला* पाऊस लागू नये म्हणून आजीने छत्री उघडली.

जोरात वारे वाहत होते, छत्री उघडताच छत्रीमध्ये वारा *शिरला* .त्यामुळे छत्रीसह मागील महिला दुचाकीवरून बाहेर *फेकली* गेली. अचानक झालेल्या प्रकाराने समोरील त्यांचे "पती" भांभावून गेले होते. काही कळते न कळते तोच त्या महिला एका *दगडावर* जोरात आदळल्या होत्या. आणि *बेशुद्ध* पडल्या.

तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या पतीने - नातेवाईकांनी आणि जवळच्या लोकांनी *हॉस्पिटलमध्ये* दाखल केले. तात्काळ *शस्त्रक्रिया* केली गेली.*मेंदूवर* जोरात मार लागल्याने "गंभीर इजा" झाली होती, आणि डॉक्टरांनी आपले शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले होते, परंतु दुर्दैवाने *अतिरक्तस्रावाने* 4 दिवसानी त्या महिलेने "प्राण" सोडला आणि नातेवाईकांनी एकच "हंबरडा" फोडला.

, *दुचाकी मागील व्यक्तींनी घ्यावयाची काळजी !*

पाऊस असेल आणि वारा असेल तर दुचाकी मागे *साईडला* न बसता *दोन्ही पाय बाजूला* ठेवून बसावे. जेणेकरून छत्री उघडताच पावसाने अथवा वाऱ्याने *तोल* गेला तरी एका हाताने समोरच्या व्यक्तीला "धरता" येते. आणि आपला जीव वाचू शकतो.

पाऊस आणि वारा याचे आकलन न करता,केवळ *छत्रीमुळे* सहजच "बळी" गेलेले अनेक लोक आहेत.त्यामुळे क्षणार्धात आपल्या आप्तस्वकीयांना आपण *पोरके* होतो.

त्यामुळे समस्त वाचकांनी या लेखाचे "गांभीर्य" ओळखून योग्य ती "खबरदारी" घ्यावी !


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा