Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २५ जानेवारी, २०२५

*भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणीला चांदापुरी पठाण वस्ती येथे वाढता प्रतिसाद* *भाजपा पक्षाचे 500 पेक्षा अधिक सभासद नोंदणी*

 


*माळशिरस ---प्रतिनिधी*

   *रशीद. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

माळशिरस तालुक्यातील चांदापूरी पठाणवस्ती परिसरात भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख शाहिद शेख यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या व भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे सर्व सेलचे प्रमुख यांच्या आव्हानानुसार माळशिरस तालुक्यातील चांदापुरी पठाण वस्ती या छोट्याशा गावातून सुमारे पाचशेच्या आसपास भारतीय जनता पक्षाच्या सभासदांची नोंदणी शाहिद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असल्याने त्यांचे इतर सर्व भाजप कार्यकर्त्यांनी आदर्श घेऊन अनुकरण करावे अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या गोटातून केली जात आहे चांदापुरी पठाण वस्ती सारख्या भागात अल्पसंख्यांक लोकसंख्या जास्त आहे भाजप पक्षाच्या सभासदाची नोंदणी एवढ्या मोठ्या संख्येने केली असल्याने शाहिद शेख यांचे भाजपच्या गोटात कौतुक व अभिनंदन केले जात आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा