*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर तहसील कार्यालयात पारदर्शकपणे कामे पार पाडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या कोतावालांना तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी १५ दिवसात तब्बल दोन परिपत्रक काढून नियुक्त केलेल्या सज्ज्याच्या ठिकाणी काम करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. त्यामुळे तहसीलदारांना कोतवाल हे आताच का नकोसे वाटू लागले आहेत, याची चर्चा रंगली आहे.
महसूल विभाग ढिसाळ कारभार व अंतर्गत मतभेदांमुळे चर्चेत आहे. सिंदफळ येथील एकाच शेतीचे दोन बोगस बिनशेती आदेश पारित
केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मनमानी कारभाराचे पितळ उघडे पडले. प्रकरणाशी निगडित महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी व एजंटांना शोधून काढण्यासाठी पोलिस पायाला भिंगरी लावून तपास करत आहेत. याचाच परिणाम म्हणून तुळजापूरचे
तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी अनेक वर्षांपासून तहसील कार्यालयातील महत्वाच्या विभागात काम करणाऱ्या ३२ कोतवालांना शासन आदेशानुसार नियुक्तीच्या ठिकाणी राहून काम करण्याबाबत एकाच महिन्यात दोन परिपत्रक काढत सक्तीचे निर्देश दिले.
*तहसीलदाराच्या दोन परिपत्रकानंतरही रेकॉर्ड रूम मध्ये खाजगी व्यक्ती*
तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळगे यांनी पंधरा दिवसात दोन परिपत्रक काढून शासनमान्य व अधिकृत कोतवालांना तहसील कार्यालयात कामकाज करण्यास पायबंद घातला आहे नियुक्त केलेल्या सध्याच्या ठिकाणी राहून काम करण्याचे निर्देश दिले आहेत आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला तरीही अभिलेख कक्षात खाजगी व्यक्ती व एक कोतवाल काम करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा