Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

*तळवळे (ता. माढा) ग्रामपंचायत च्या सरपंचपदी "संजय मामा शिंदे" गटाच्या 'रंजना परबत' यांची बिनविरोध निवड*

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

माढा तालुक्यातील व करमाळा विधानसभा मतदारसंघातील तडवळे (म) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार संजयमामा शिंदे गटाच्या रंजना सिद्धेश्वर परबत यांची बिनविरोध निवड झाली.




शिवानी गिरी यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी २२ जानेवारी रोजी तडवळे ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी संजयमामा शिंदे गटाच्या रंजना सिद्धेश्वर परबत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुर्यकांत डिकोळे यांनी रंजना परबत यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी तलाठी प्रतिक्षा वाघमारे ग्रामसेवक मजहर महमद मुलाणी, उपसरपंच महेंद्र शहाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवानी गिरी, सारिका परबत, कमल गोसावी, प्रभावती लोंढे, अशोक वाघमारे यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी, माजी पदाधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता स्मृतीशेष शोभाआई विश्वनाथ परबत यांच्या विचारांना अनुसरून गावाच्या विकासासाठी व विशेषतः महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच रंजना परबत यांनी दिली आहे.सरपंच पदी निवड झाल्याबद्दल रंजना परबत यांचे माजी आमदार संजयमामा शिंदे, आप्पासाहेब उबाळे, पार्टीप्रमुख तथा विठ्ठलराव शिंदे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ परबत, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



कोट


स्मृतिषेश शोभा विश्वनाथ परबत या ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांना सरपंच पदाची संधी मिळणार होती पण त्या दरम्यान त्यांचे एका रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर ती संधी त्यांच्या जाऊबाई रंजना सिद्धेश्वर परबत यांना मिळाल्याने या निवडीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा