Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

*ॲग्रीस्टॅक -कृषी डिजिटल सेवा व सर्व समावेशक पायाभूत सेवा प्लॅटफॉर्म ----- सेवारत्न सतीश कचरे, मंडल कृषी अधिकारी अकलूज ,आयएसओ 9001:2015*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

भारत देशासह महाराष्ट्र राज्य कृषी प्रधान राज्य आहे संबंधित क्षेत्रात 55 टक्के लोकसंख्या आहे .या बहुसंख्य शेतकरी बांधवांना शेतकरी ओळख क्रमांकसह कृषी डिजिटल सेवा व सर्व समावेशक पायाभूत सेवा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे .ॲग्रीस्टॅक हे कृषी डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने परिणामकारकरीत्या पोहोचवण्यासाठी स्थापित केली जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे .कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे,कृषी उपक्रमाची कार्यक्षेत्रात सुधारणा,योजना आखणी,अंमलबजावणी करणे ,योग्य वेळी योग्य निर्णय,वेळेवर सेवा प्रदान हा प्रमुख उद्देश ठेवून राज्यात सर्व गावात हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे . तरी शेतकरी बांधवांनी त्यात सहभाग नोंदवून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून भविष्यातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना अनुषंगाने सर्व बाबी साठी हे उपयुक्त ठरणार आहे .             ॲग्रीस्टॅक चे उद्देश :- १-शेतकरी आधार संलग्न माहिती संच -फार्मर रजिस्ट्री स्थापन करणे २ -शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच -क्रॉपसॉन हिस्ट्री रजिस्ट्री -ई पीक पाणी ३ -शेतीचे भू संदर्भीकृत माहिती संच -प्रेफरन्स लँड पार्सल ४ -केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणकारी योजना सुलभ पारदर्शक वेळेवर पोचविणे . ५ -शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज उच्च गुणवत्ता कृषी निविष्ठा विपणन व विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे ६ -शेतकऱ्यांना बाजारपेठेत माहितीपूर्ण व सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे . ७ -शेतकरी बांधवांना विविध योजना जलद गतीने देण्यासाठी ओळख पटवून द्यायची पारदर्शक व सोपी पद्धत व प्रमाणीकरण पद्धत विकसित करणे . ८ -शेतकऱ्यांना सेवा पुरवण्यासाठी कृषी सेवा संलग्न विभाग अभिसरण प्रक्रिया सुलभ करणे . ९ -उच्च गुणवत्तेचा डाटा व ॲग्रीटेक द्वारे कृषी उत्पादने सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे .                             ॲग्रीस्टॅक चे फायदे - या नविन्यपूर्ण  प्रकल्पांतर्गत शेतकरी बांधवांनी संमती दिल्यानंतर त्यांना शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त होणार आहे व या ओळख क्रमांक च्या आधारे खालील प्रकारचे फायदे त्यांना भविष्यात मिळणार आहेत १ -पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान मानधन आवश्यकतेच्या अटीपूर्ण लाभ प्राप्त करण्यास सुलभता येऊन सर्व पात्र लाभार्थींना समाविष्ट करून घेण्यात सहसाध्य होईल . २ -शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासाच्या इतर सर्व कर्ज उपलब्ध करून देण्यात सुलभता येईल व राहील . ३ -पिक विमा व आपत्ती व्यवस्थापन इत्यादीच्या सर्वेक्षण सर्व्हे व नुकसान भरपाई मध्ये सुलभता येण्यास मदत होईल . ४ -किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकरी बांधवांची ऑनलाइन नोंदणीकरण होण्यास मदत होईल . ५ -शेतकरी बांधवांना कर्ज वित्तपुरवठा निविष्ठा व इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांची कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देता येईल . ६ -शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना लाभ देण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकरी आधार संलग्न माहिती संच द्वारे लाभ वितरित करण्यास सुलभता येईल . ७-शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले विस्तार कार्यक्रम प्रचार प्रसार माहिती सहजपणे प्राप्त होईल .ॲग्रीस्टॅकवरील उद्देश व फायदे शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकार व भारत सरकार यांच्यातील झालेल्या 11 जुलै 2024 च्या सामंजस्य करार मुळे प्राप्त करून घेता येतील .तरी याद्वारे शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी ग्रामस्थारावरील कृषी सहाय्यक यांना सहकार्य करावे व अधिकच्या माहितीसाठी प्रश्न अडचणी सल्ला मार्गदर्शन इत्यादीसाठी नजीकच्या ग्रामसुल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा