Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ जानेवारी, २०२५

*अकलूज येथील भव्य" लेझीम स्पर्धेचा" समारोप*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज येथे संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या १९ व्या भव्य लेझीम स्पर्धेत सदाशिवराव माने विद्यालय अकलूजच्या शहरी मुले,मुली व प्राथमिक या तीनही गटाने प्रथम क्रमांक पटकावला. बक्षीस वितरणाने या स्पर्धेचा समारोप झाला.  

      विजय चौक अकलूज येथे संपन्न झालेल्या स्पर्धेसाठी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,कार्याध्यक्षा कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील,चि.सयाजीराजे मोहिते पाटील,शंकरराव माने-देशमुख, दीपक खराडे-पाटील,सतिशराव माने-देशमुख,अभिजीत रणवरे, हर्षवर्धन खराडे-पाटील,नितीन निंबाळकर,महादेव अंधारे, सुभाष दळवी,नारायण फुले, पांडुरंग एकतपुरे,रामचंद्र गायकवाड,अनिल कोकाटे, आप्पासाहेब मगर यांचेसह परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



        यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन करताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, 

 मोबाईल आणि टीव्हीमुळे मुले मैदानावर खेळत नाहीत.लेझीम खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. स्पर्धेत मुलांसह मुलींचाही सहभाग मोठा आहे.त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व पालकांचेही कौतुक आहे.

          स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या की,संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळांने मागील १९ वर्षापासून लेझीम स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण परंपरा जतन केलेली आहे सुमारे. सुमारे ६० हजारपेक्षा अधिक खेळाडू तयार झाले आहेत.मंडळाचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.हा लेझीम खेळ स्पर्धेपुरता मर्यादित न ठेवता आपल्या गावामध्येसुद्धा कायम चालू ठेवला पाहिजे.


स्पर्धेचा निकाल -- (प्राथमिक गट) प्रथम क्रमांक-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज,द्वितीय क्रमांक-महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर, तृतीय क्रमांक-श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक विभाग मांडवे.

          खुला गट -(मुली) प्रथम क्रमांक-श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महिला वसतिगृह अकलूज.(मुले),कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यार्थी वसतिगृह मोरोची व विजय विद्यार्थी वसतिगृह अकलूज आणि शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज.

         ग्रामीण गट (मुले) प्रथम क्रमांक-मोरजाई विद्यालय मोरोची,द्वितीय क्रमांक-श्री सावता माळी विद्यालय माळेवाडी,तृतीय क्रमांक- सदाशिवराव माने विद्यालय माणकी व श्री बाणलींग विद्यालय फोंडशिरस.(मुली) प्रथम क्रमांक-सावतामाळी विद्यालय माळेवाडी व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला नातेपुते, द्वितीय क्रमांक-श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस,तृतीय क्रमांक-श्री चक्रेश्वर माध्यमिक विद्यालय चाकोरे.

       शहरी गट (मुली) प्रथम क्रमांक-जिजामाता कन्या प्रशाला अकलूज,सदाशिवराव माने विद्यालय अकलूज व महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,द्वितीय क्रमांक लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर,प्रोत्साहनपर श्री हनुमान विद्यालय लवंग.(मुले) प्रथम सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,द्वितीय महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर, तृतीय श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय वाघोली व कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर.

        या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रुपये ५ हजार,चषक व प्रशस्तीपत्र,द्वितीय क्रमांक ४ हजार,तृतीय क्रमांकास रुपये ३ हजार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र अशी बक्षिसे देण्यात आली. याचबरोबर उत्कृष्ट प्रशिक्षक सुभाष चव्हाण,उत्कृष्ट हलगी वादक विकास कांबळे,उत्कृष्ट घुमके वादक प्रदीप मस्के,उत्कृष्ट सनई वादक बंडू केंगार व उत्कृष्ट झांज वादक सदाशिव आरडे यांना रोख रक्कम बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

          तीन दिवसात या स्पर्धेमध्ये एकूण ५५ संघातून सुमारे २१५० खेळाडूंनी आपला खेळ सादर केला.मंडळाचे सर्व पदाधिकारी,सदस्य यांनी ही स्पर्धा उत्कृष्टपणे पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.



*चौकट..*

जयसिंह मोहिते पाटील व कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्यासह उपस्थित महिला पालकांनीही लेझीमचा डाव सादर केला.हलगीच्या तालावर त्यांनी ठेका धरला.उपस्थितांनीही त्यांना मनमुराद दाद दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा