Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ११ जानेवारी, २०२५

विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघात धाराशिव चे जिल्हाधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुजाभाव केला

 *विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघात धाराशिव चे जिल्हाधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुजाभाव केला ?....तुळजापूर निवडणूक निर्णय अधिकारी यांची आयोगाकडे तक्रारी वर सुनावणी ला जिल्हाधिकाऱ्याची गैरहजरी..



*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मदत केली नाही, जाणीवपूर्वक दुजाभाव केला. सोयीसुविधा पुरविण्यात हयगय केली, अशी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची तक्रार तुळजापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार ढवळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी घेऊन अहवाल देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर अप्पर विभागीय आयुक्तांनी धाराशिवला भेट दिली. मात्र, या सुनावणीला जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले असून, हे सारे कपोलकल्पित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार ढवळे यांनी, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय निवडणूक आयोगाला त्यांचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. यात अनेक आक्षेपार्ह बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. तुळजापूर आणि अन्य मतदारसंघांतील निवडणुकीतील खर्चात मोठी तफावत दिसून आली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री पुरविण्यात आली नाही. उपलब्ध असलेल्या एकूण १३ पैकी प्रत्येक मतदारसंघाला चार वाहने पुरविणे अपेक्षित होते. मात्र, तुळजापूर विधानसभेसाठी केवळ एक वाहन उपलब्ध करून दिले गेले मतदान यंत्र व्हीव्हीपॅट मशीन यांच्या वाहतुकीसाठी अन्य मतदारसंघात प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले त्याचवेळी तुळजापूर विधानसभेसाठी केवळ तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले साहित्यवाटपासाठी जिल्ह्यातील अन्य तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मंडपावर २३ ते २५ लाख रुपये खर्च करण्यात आला. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मात्र त्यासाठी केवळ नऊ लाख ९० हजार रुपये खर्चण्यात आले.


निवडणूक आयोगाने यासाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची कौतुकाने दखल घेणे अपेक्षित असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याकडील सर्व अधिकार तहसीलदारांना सुपूर्द केल्याचे या अहवालात ढवळे यांनी नमूद केले आहे.

 

*जिल्हाधिकारी धाराशिव यांची धमकी!*

*"तक्रार करण्यालायक राहणार नाहीस*

   या अहवालापूर्वी 18 नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवळे यांनी एक अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता त्यावेळी िल्हाधिकार्‍यांनी ढवळे यांना तू मोठी चूक केली यापुढे तक्रार करण्यालायक राहणार नाही माझ्या परवानगीशिवाय माझ्या माणसावर गुन्हा दाखल करतोस? तुझे करिअर बरबाद करून टाकीन अशी धमकी जिल्हाधिकारी दिली असल्याचे ढवळे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा