*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
पुणे दि. १०.०१.२०२५ :- अॅड. तोसिफ शेख, यांनी दिलीप मंडल यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या विरोधात पुणे पोलिसांच्या बंडगार्डन पोलीस स्टेशनला तातडीने एफ.आय.आर. नोंदवण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म "X" (पूर्वीचे ट्विटर) वर दिलीप मंडल यांनी त्यांच्या अकाउंटवरून ९ जानेवारी २०२५ रोजी "फातिमा शेख" या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाच्या अस्तित्वाबद्दल अपमानजनक आणि फसवे दावे करणारे पोस्ट केला. या पोस्टमधून त्यांनी दावा केला की "फातिमा शेख" एक काल्पनिक व्यक्ति होती व ते काल्पनिक पात्र मीच बनवले असे फसवे दावे करत आहेत आणि त्याचे अस्तित्व कधीच नव्हते. यामुळे समाजातील वंचित वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, विशेषतः फातिमा शेख यांच्या ऐतिहासिक कार्याचा अभिमान बाळगणाऱ्या घटकांचे मन दुखावले आहे.
अॅड. तोसिफ शेख यांनी म्हटले की, "या प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत आणि धार्मिक सलोखा बिघडवला जात आहे. फातिमा शेख यांचे नाव महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याशी संबंधित आहे. यामुळे समाजातील धार्मिक एकता आणि सौहार्द धोक्यात आले आहेत."
अॅड. तोसिफ शेख यांनी दिलीप मंडल यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अन्वये गुन्हा नोंदवण्याची मागणी केली असून, त्यांनी या आक्षेपार्ह पोस्टला काढून टाकण्याचीही मागणी केली आहे.
हे सर्व धर्म, जात, पंथ आणि समुदायाच्या शांततेला बाधा आणणारे असून, त्यामुळे पुणे पोलिसांनी तातडीने योग्य कारवाई करावी, अशी आवाहनही त्यांनी केले आहे.
९८६०९०७३५७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा