Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

*तर ....धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु देणार नाही-- मनोज जरांगे पाटलांचा इशारा*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकऱणातील तीन फरार आरोपींपैकी दोन आरोपींच्या मुसक्या अवळण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील राजकीय वर्तुळातील काही नेत्यांकडून केली जात असताना देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भरसभेतून थेट जाहीरपणे इशारा दिला. आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे पाटील म्हणाले, ‘जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्याने फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला तो आम्ही सहन केला. पण आता जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढं त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो, बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसून मारायचं’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा